Friday, April 26, 2024
Homeनाशिकमालवाहतुकीचे दर वाढणार!; माेठे आंदाेलन उभारले जाणार

मालवाहतुकीचे दर वाढणार!; माेठे आंदाेलन उभारले जाणार

नाशिक | Nashik (प्रतिनिधी)

पंधरा वर्षांवरील वाहने स्क्रॅप करण्याच्या निर्णयाला राज्यातील वाहतूक संघटनांनी विरोध दर्शविला आहे. त्या विरोधात आंदोलन करण्याचा निर्णय वाहतूकदारांनी घेतला आहे. तर, या निर्णयामुळे मालवाहतुकीचे दर वाढू शकतात, अशी भीतीही काही वाहतूक संघटनांनी व्यक्त केली.

- Advertisement -

प्रवासी वाहतूक करण्यासाठी २० वर्षांपेक्षा जास्त जुन्या बस कोणीही वापरत नाही. मात्र, मालवाहतूक करणाऱ्या वाहनांना त्याचा फरक पडेल. तसेच फिटनेस सेंटरमध्ये तपासणीचे शुल्क किती असेल, यावरही अर्थकारण अवलंबून असेल. परंतु, प्रशासकीय प्रक्रिया वाढल्यामुळे खर्च वाढेल, परिणामी मालवाहतुकीचे दर वाढू शकतील, असे संघटनांचे मत आहे.

केंद्र सरकारने यापूर्वी घेतलेल्या निर्णयाप्रमाणे रिक्षा व टॅक्सी चालकांनी हजारो रुपये खर्च करून सीएनजी किट लावलेले आहेत. त्याच्या बँकांच्या कर्जाचे हप्ते अजूनही सुरू आहेत. केंद्र सरकारने फक्त कमी अंतरासाठी चालणाऱ्या वाहनांसाठी इंजिनाला पर्याय शोधावा.

या निर्णयामुळे मेट्रो शहरे वगळता संपूर्ण तालुका व ग्रामीण भागात चालणाऱ्या रिक्षा टॅक्सी बस ट्रक या वाहनचालकांवर फार मोठा आर्थिक फटका बसणार आहे. त्यामुळे या निर्णयाचा केंद्र सरकारने फेरविचार करावा अन्यथा आंदोलन करण्यात येईल, अशी भुमिका संघटनांनी घेतली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या