Thursday, April 25, 2024
Homeनाशिककसारा घाटात मालगाडीचे डबे रुळावरुन घसरले

कसारा घाटात मालगाडीचे डबे रुळावरुन घसरले

इगतपुरी । Igatpuri

इगतपुरी कसारा घाटातील जव्हार फाट्याजवळ रेल्वे मालगाडीच्या एका डब्याचे चाक रुळावरून घसरल्याने काही काळ वाहतूक ठप्प झाली होती.

- Advertisement -

याबाबत सविस्तर वृत्त असे की, मुबंईहुन येणारी मालगाडी कसारा घाट पार करत असतांना दुपारी तीन वाजेच्या सुमारास घाटातील जव्हार फाट्याजवळ टीजीआर 3 या पोलजवळ मालगाडीच्या डब्याचे चाक रुळावरुन घसरल्याने मुंबईकडे जाणारी डाऊन मार्गाची वाहतूक टप्प झाली होती.

या अपघाताची माहिती रेल्वे प्रशासनाला मिळताच मालगाडीचे चाक रुळावर आणण्यासाठी रेल्वे दुर्घटना सहाय्यता गाडीतील कर्मचारी यांनी भर पावसात युद्धपातळीवर काम चालू होते.

मात्र मुबंईहुन येणाऱ्या मेल व एक्सप्रेस या रेल्वे गाड्या दुसऱ्या लाईनवर वळविण्यात आल्याने दोन तासाच्यावर रेल्वे वाहतुकीवर काही परिणाम झाला नाही. त्यासाठी दुसऱ्या रेल्वे लाईन वरून गाड्या वळवण्यात आल्या असे रेल्वे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले.

- Advertisment -

ताज्या बातम्या