बँकखाते गोठविण्याची महापालिकेवर नामुष्की

jalgaon-digital
2 Min Read

जळगाव – Jalgaon – प्रतिनिधी :

अकृषक करापोटी महानगरपालिकेकडे सन 2001 पासून 13 कोटी 23 लाख रुपयांची थकबाकी आहे.

मनपाने थकबाकी न भरल्याने महसूल विभागातर्फे मनपाचे बँकखाते गोठविण्याचे आदेश सहाय्यक जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी दिले. त्यामुळे पुन्हा एकदा बँकखाती गोठविण्याची नामुष्की मनपावर ओढावली आहे.

महसूल विभागाने मार्च अखेरची वसूली करण्यासाठी मोहीम हाती घेतली आहे. शहरातील विविध आस्थापानाकडे गेल्या अनेक वर्षांपासून मोठ्या प्रमाणात थकबाकी असल्याने ही थकबाकी वसुलीसाठी वसूली पथक कारवाई करीत आहे.

यात ज्या अस्थापानाकडे थकबाकी आहे अशा अस्थापानाचे बँक खाती गोठविण्याचे आदेश उपविभागीय अधिकारी तृप्ती धोडमीसे यांनी दिले आहेत.

मनपाकडे सन 2002 पासून विविध करांपोटी सुमारे साडे तेरा कोटी रुपयांची थकबाकी असल्याने मनपाच्या विविध बँकांमध्ये असलेले बँक खाते गोठविण्याचे आदेश दिले आहेत. मात्र बँकेकडून कुठलाही पत्रव्यवहार झाला नसल्याने धोडमिसे यांनी सांगितले.

थकीत रकमेवर मनपाची हरकत

अकृषक करापोटी असलेली थकीत रक्कम असल्याचे कारण देत मनपाने हरकत घेतली आहे. दरम्यान हरकत घेतल्याचे पत्र देखील मनपा प्रशासनाने जिल्हाधिकार्‍यांना दिले असल्याचे समजते.

अकृषक करापोटी थकबाकी

मनपाकडे महससूल विभागाच्या अकृषक करापोटी मनपाकडे 13 कोटी 23 लाख 83 हजार 242 रूपयांची थकबाकी आहे. ही थकबाकी वसूल करण्यासाठी सहाय्यक जिल्हाधिकारी तृप्ती धोडमीसे यांनी महापालिकेची बँक खाते गोठविण्याचे आदेश दिले आहे. हे आदेश काढताच मनपाचे बँक खाते गोठविण्याची नामुष्की ओढावली आहे.

या बँकांमध्ये आहे मनपाची खाती

महापालिकेचे जळगाव शहरातील स्टेट बँक ऑफ इंडिया, अ‍ॅक्सीस बँक, बँक ऑफ बडोदा, जे.डी.सी.सी. बँक, अलहाबाद बँक, इंडीयन बँक, स्टेट बँक ऑफ हैदराबाद यांच्या शाखा व्यवस्थापकांना पत्र पाठवून बँकेचे खाते सील करण्याबाबत सांगण्यात आले.

हे बँक खाते सिल झाले किंवा नाही याबाबत 15 मार्चपर्यत प्रांताधिकारी कार्यालयास कळविण्याचे सांगण्यात आले आहे. असून याबाबत अद्याप कुठलीही माहिती प्राप्त झाली नाही.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *