Wednesday, April 24, 2024
Homeनाशिकज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिकाचे अनोखे दातृत्व

ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिकाचे अनोखे दातृत्व

नवीन नाशिक । प्रतिनिधी New Nashik

कोविड-१९ चा मुकाबला करण्यासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीला बहुतांश संस्थांनी निधी दिला आहे. पाथर्डीरोड परिसरात राहणारे ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक दगडुसा गोपाळसा कलाल (९५) यांनी स्वातंत्र्यसैनिक सन्मान निवृत्ती वेतनातून एक महिन्याचे निवृत्ती वेतन रुपये दहा हजार रुपयांचा धनादेश कोविड-१९ साठी मुख्यमंत्री सहायता निधीला देण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्याकडे सुपूर्द करून समाजापुढे आदर्श ठेवला आहे.

- Advertisement -

मुख्यमंत्री सहायता निधीत रक्कम जमा करण्याच्या आवाहनाला प्रतिसाद देताना विविध संस्थांनी निधी जमा करून उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत आहे. या निधीसाठी आपलीही रक्कम जमा झाली पाहिजे, या भावनेने हुतात्मा स्मारक नाशिक येथील स्वातंत्र्यसैनिक समितीचे ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक कलाल (रा.पाथर्डी रोड, इंदिरा नगर, कमल १३, वनवैभव कॉलनी) यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील कोविड-१९ कक्षात संबंधित अधिकारी प्रशांत वाघमारे यांच्याकडे दहा हजाराचा धनादेश सुपूर्द केला.

ही रक्कम त्यांना शासनाकडून मिळणार्‍या स्वातंत्र्यसैनिक सन्मान निवृत्ती वेतनातून एक महिन्याच्या निवृत्ती वेतना इतकी दिली आहे. त्यांच्या या सामाजिक उपक्रमाचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. नाशिक शिक्षण प्रसारक मंडळाच्या कार्यकारी मंडळाचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र कलाल यांचे ते आजेसासरे आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या