Thursday, April 25, 2024
Homeनाशिकदेवळालीत रूग्ण व नातेवाईकांना मोफत भोजन व्यवस्था

देवळालीत रूग्ण व नातेवाईकांना मोफत भोजन व्यवस्था

देवळाली कॅम्प । दि. 11 वार्ताहर

करोना महामारीने हतबल झालेल्या नागरिकांना दिलासा देण्यासाठी डब्ल्यूएमओतर्फे मोफत टिफीन सेवा पुरविली जात आहे. परिसरात दररोज 200 टिफीन गरजूंपर्यंत पोहोच केले जात असल्याची माहिती सागर गोडसे यांनी दिली.

- Advertisement -

करोनाग्रस्त तसेच काही कुटुंबातील सर्व सदस्य बाधित झालेले असल्याने त्यांना जेवणाची सोय उपलब्ध होत नव्हती. ही बाब लक्षात घेत वर्ल्ड मराठा ऑगनायझेशनच्या सभासदांनी शहरात मोफत जेवणाची व्यवस्था सुरू केली आहे. लॉकडाउनमुळे हॉटेल्स बंद असल्याने जेवणाची सोय होत नाही, हे लक्षात घेऊन दिवसातून दोन वेळा जेवण उपलब्ध करून देण्यासाठी डब्ल्यूएमओने पुढाकार घेतला आहे. आठ दिवसांपासून सकाळी, संध्याकाळी एक हजारावर टिफीन पुरविण्याची व्यवस्था करण्यात आली. वर्ल्ड मराठा ऑगनायझेशन व हॉटेल दि बड पाकच्या वतीने परिसरातील कॅन्टोन्मेंट दवाखाना, कॅन्टोन्मेंट क्वारंटाइन शाळा, संसरी गाव, लॅमरोड, भगूर, देवी मंदिर, विहितगाव भागात दररोज सकाळी 100 व संध्याकाळी 100 अशी 200 टिफीन पुरवले जात आहे. या कामी सागर गोडसे, वैभव पाळदे, सागर सहाणे, रवि देवकर, रवि कुटे, प्रविण आडके, अशोक गवळी, प्रशांत धिवंदे, संतोष गोडसे, शाम गोडसे, निलेश आडके, अजय गोडसे आदी कार्यरत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या