Thursday, April 25, 2024
HomeUncategorizedकोरोनात मुक्तसंवाद... करुया रेडिओची बात....

कोरोनात मुक्तसंवाद… करुया रेडिओची बात….

किरण विठ्ठल पाटील

युवक मित्रांनो आज 13 फेब्रुवारी आज एक विशेष जागतिक दिवस आहे काय विचारात पडलात ना? तुम्हाला असं वाटेल की 13 फेब्रुवारी ला काय विशेष आहे विशेष तर 14 फेब्रुवारी ला असतो प्रेमदिन… पण माझ्या युवक मित्रांनो मी तुम्हाला आजच्या काहीशा अपरिचित दिवसांचीच ओळख करून देत आहे तर ते म्हणजे 13 फेब्रुवारी हा जागतिक रेडिओ दिवस म्हणून साजरा केला जातो…

- Advertisement -

जागतिक महामारी आजार कोरोना या मुळे आपण सर्व फारच वाईट काळातून जातोय गेली जवळपास 10,11 महिन्यांपासून आपण मुक्त संवाद केलेलाच नाही आता हळूहळू आपण पुन्हा कोरोना वर मात करून पुढे पुढे सरकतो पण अजूनही कोरोना पुर्ण पणे गेलेला नाही जो पर्यंत सर्वांना लस मिळत नाही तो पर्यंत सर्वांनी मास्क वापरावे हात स्वच्छ धुवावे 1 मिटर अंतर पाळावे हि सर्व काळजी घेत घेत आपण मुक्त संवाद ही सुरू करावा जसे कि रेडिओ वर असतो ना वाढत वय मुक्त संवाद अगदी तसचं… माझ्या युवक मित्रांनो आज 13 फेब्रुवारी आज एक विशेष जागतिक दिवस आहे काय विचारात पडलात ना? तुम्हाला असं वाटेल की 13 फेब्रुवारी ला काय विशेष आहे विशेष तर 14 फेब्रुवारी ला असतो प्रेमदिन… पण माझ्या युवक मित्रांनो मी तुम्हाला आजच्या काहीशा अपरिचित दिवसांचीच ओळख करून देत आहे तर ते म्हणजे 13 फेब्रुवारी हा जागतिक रेडिओ दिवस म्हणून साजरा केला जातो…

आजच्या या आधुनिक काळात सुश्राव्य माध्यम विस्मरणात जाऊ नये म्हणून या जागतिक दिवसाची संकल्पना पुढे आली प्रथम ती 2011 च्या युनेस्को च्या बैठकीत मांडली गेली त्यानंतर 2012 पासून दरवर्षी हा जागतिक दिवस साजरा केला जातो आता 13 फेब्रुवारी हाच दिनांक म्हणून का निवडला गेला? तर 13 फेब्रुवारी 1946 ला संयुक्त राष्ट्रसंघाने आपली रेडिओ सेवा सुरू केली होती त्याची आठवण म्हणुन 13 फेब्रुवारी हा जागतिक रेडिओ दिवस म्हणून साजरा केला जातो…

जगभरातील लोक रेडिओ आणि त्यानुसार आपले जिवन कसे साकारू अन् विकसित करू शकतात तसेच जग बदलण्यासाठी सकारात्मक संवाद साधण्यासाठी रेडिओ जगभरातील लोकांना एकत्र आणू शकतो याच उद्देशाने हा दिवस साजरा करण्यात येतो रेडिओ हे जगातील सर्वांत जास्तीत जास्त जनतेपर्यंत पोहोचणारे मोठे माध्यम आहे हे एक शक्तिशाली संपर्क साधन आणि कमी खर्चाचे माध्यम म्हणून देखील ओळखले जाते या माध्यमातून दुर रहिवासी त असलेल्या लोकांपर्यंत सहजरीत्या पोहचण्यास मदत होते यामुळे रेडिओ हे माध्यम बहुतांश लोकांना जवळचे वाटते…

भारतात रेडिओचा इतिहास तसा जुना आहे रेडिओचा शोध 1885 मध्ये इटालियन भौतिक शास्त्रज्ञ मार्कोनी याने लावल्याचे मानले जाते मात्र त्या आधीपासून जगातल्या विविध भागात बिनतारी प्रक्षेपणाचे प्रयोग सुरू होते त्यात आपले जगदीशचंद्र बोस यांनीही अशाच एका प्रयोगाचे प्रदर्शन कोलकत्यात 1884 ला केलें होते… इंडियन ब्रॉड कास्टिंग कंपनीने मुंबई व कलकत्ता येथे दोन रेडिओ स्टेशनच्या माध्यमातून प्रसारणाला सुरुवात केली होती पुढे हि कंपनी दिवाळखोरीत गेली व रेडिओ प्रसारण सरकारने आपल्या ताब्यात घेतले 1936 ला त्याला ऑल इंडिया रेडिओ हे नाव मिळाले…

ऑल इंडिया रेडिओ आकाशवाणी हे नाव म्हैसूरच्या एम. व्हीं. गोपालस्वामी यांनी दिले स्वातंत्र्यानंतर भारतात रेडिओची भरभराट झाली विविध भारतीने रेडिओ वरच्या मनोरंजनाला एक वेगळी उंची प्रदान केली… आताच्या नवीन पिढीतील तरुणांना रेडिओ बद्दल तितकं ज्ञान नसेल तर मग मी सांगतो की,आता थोडं रेडिओ उपकरणा बद्दल पूर्वी भला मोठा रेडिओ मग ट्राझिस्टर, खिशात मावणारा रेडिओ आणि आता मोबाइल मध्ये रेडिओ – अँप अशी स्थित्यंतरे आपण पाहिली असतील त्याच्या गमती ही आहेत एके काळी रेडिओ ऐकण्यासाठी सशुल्क सरकारी परवाना काढावा लागत असे तसेच त्याचे वार्षिक नुतनीकरण पोस्टात जाऊन करावा लागत असे हे ऐकुन आताच्या युवक मित्रांना हसू येईल साधारणपणे 1980-82 दरम्यान मा. वसंत साठे हे केंद्रीय नभोवाणी मंत्री असताना रद्द करण्यात आले व सर्वांना रेडिओ सेवा मुफ्त करण्यात आली … आज जागतिक रेडिओ दिवस पूर्वीच्या काळी टीव्ही मोबाइल येण्याआधी रेडीओवर बातम्या प्रसारित होत असत यावेळी सकाळी सकाळी नमस्कार थोड्याच वेळात आकाशवाणी मुंबई केंद्रावरून बातम्या प्रसारित होतील हिंदी बातम्या असतील तर त्या दिल्ली केंद्रावरून प्रसारीत व्हायच्या यह आकाशवाणी केंद्र है आप सून रहे है आपकी फरमाहिष….

हा नावाजलेला कार्यक्रम आजही आवडीने ऐकला जातो लहानपणी विविध भारती भुले बिसरे गीत, बेला के फुलं, तसेच दर बुधवारी संध्याकाळचे 8 वाजलेकी अमीन सयानी की आवाज मेरे प्यारे बहनो और भाई यो ये सिलोन ब्रॉड का स्टिंग करपोरेशन का निदेश विभाग है अशा रीतीने सुरुवाती ने होणारी बिनाका गीतमाला याची काय वर्णावी? रेडिओ मुळे अनेक गीतांचे गीतकार, संगीतकार, गायक नीट लक्षात यायचे विविध भारतीवर गाणे लावण्यापूर्वी अगदी स्पष्ट आणि खणखणीत आवाजात निवेदक वा निवेदिका सांगायचे आईये अब सुनते है आशा भोसले किशोर कुमार की आवाज मे शैलेंद्र का लिखा गीत संगीत से सवारा है एस डी बर्मन फिल्म का नाम है… खुपचं छान वाटायचं.

आता प्रत्येक मोबाईल मध्ये एफ. एम. रेडिओ उपलब्ध आहे आता प्रत्येक देशात प्रत्येक भाषेत एफ. एम. रेडिओ उपलब्ध आहे आता नवीन पिढीतील लोकांसाठी मोबाईल टीव्ही कम्प्युटर लॅपटॉप अशी विविध साधने उपलबध आहेत आमच्या लहानपणी रेडिओ हेच मनोरंजन व माहिती मिळवण्याचे साधन होते मंगलप्रभात सुरू झाली की चला उठा आता आई जरा मोठ्या आवाजाने बाबांना उठवत असे स्वरावली वाजली की एखाद्या गृहिणींचा आवाज कानावर येई ती म्हणायची काल सर्व आवरले गेले होते यावेळी आज खूपच उशीर झाला संध्याकाळी बातम्या आवाजाचा साथीने अनेकांचा चहा व्हायचा क्रिकेट ची कॉमेन्ट्री तर लोकांचा जीव की प्राण असायचा मला अजूनही आठवते आमचे आजोबा सकाळी उठल्यानंतर आधी रेडिओ सुरू करायचे आजी रेडिओ ला ग्रामीण भाषेत रेडू म्हणायची कीती सुखाचा व खुपचं मनाला भावणारा काळ होता…

दूरदर्शनच्या आगमनाने रेडिओ मागे पडला चित्र पाहायला मिळत असताना आवाज नुसता कोन ऐकणार? यानंतर मोबाईल आणि सोशल मीडिया मुळे रेडिओ हा दुर्लक्षित होता पण आता एफ. एम. आगमनानंतर रेडिओला चांगलाच शुद्ध प्राणवायू मिळालेला दिसून येतो आहे आजही अनेक वाहनांमध्ये एफ. एम. आवडीने ऐकला जातो याचे दोन फायदे आहेत वेळोवेळी घटनेची माहिती मिळते आणि दुसरा म्हणजे जुन्या नव्या गाण्यांची मैफल या ठिकाणी ऐकायला मिळते सध्या मोबाईल मध्ये उपलब्ध असलेल्या रेडिओ मुळे एक नवीनच क्रांती झाली आहे विशेष म्हणजे सध्याच्या धावत्या युगात आणि सोशल मीडिया काळात रेडिओ ने आपली ओळख टिकवून ठेवली आहे… म्हणून माझ्या युवक मित्रांनो आजच्या या महामारी आजार कोरोना काळात ही आपण आपले मन हलकं प्रसन्न व आनंदी ठेवण्यासाठी रेडिओ चा हि मनमुराद ऐकण्याचा आस्वाद घेऊन ज्ञान, मनोरंजन व आनंद घ्यावा…

(लेखक हे भगीरथ इंग्लिश स्कूल जळगाव येथे शिक्षक आहेत.)

- Advertisment -

ताज्या बातम्या