Friday, April 26, 2024
Homeनाशिकशाळेच्या पहिल्या दिवशीच मोफत पुस्तके

शाळेच्या पहिल्या दिवशीच मोफत पुस्तके

नाशिक । प्रतिनिधी Nashik

इयत्ता पहिली ते आठवीच्या 4 लाख 89 हजार 622 विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्या दिवशी मोफत पुस्तके (Free books on the first day of school ) उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. त्यासाठी गेल्या अकरा दिवसांपासून नाशिकमधून पुस्तकांचे वितरण सुरू आहे.

- Advertisement -

यामध्ये मराठी, हिंदी, उर्दू आणि इंग्रजी माध्यमांसह एकात्मिक पाठ्यपुस्तकांचादेखील समावेश आहे. मोफत पाठयपुस्तके देण्यात येणार्‍या वर्गनिहाय विद्यार्थ्यांची संख्या पुढीलप्रमाणे – इयत्ता पहिली 57 हजार 199, इयत्ता दुसरी 56502, इयत्ता तिसरी 56 हजार 432, इयत्ता चौथी 58 हजार 942, इयत्ता पाचवी 63 हजार 698, इयत्ता सहावी 63 हजार 377, इयत्ता सातवी 67 हजार 383, इयत्ता आठवी 66192.

तालुकानिहाय मोफत पुस्तके मिळणार्‍या विद्यार्थ्यांची संख्या अशी बागलाण – 46 हजार 975, चांदवड – 27 हजार 275, देवळा – 18 हजार 293, दिंडोरी – 40 हजार 949, इगतपुरी – 25 हजार 536, कळवण – 27 हजार 168, मालेगाव – 51हजार 757, नाशिक – 25 हजार 244, निफाड – 47 हजार 973, पेठ – वीस हजार 322,सिन्नर 37 हजार वीस, सुरगाणा -28 हजार 184, त्र्यंबकेश्वर- 27 हजार 380 , येवला 29 हजार 669. एकूण -4 लाख 89 हजार 682.

पावसाळ्यात पुस्तकांचे वितरणास अडचण येऊ नये, याची खबरदारी शिक्षण विभागाकडून घेण्यात आली आहे. यासाठी पाठ्यपुस्तकांचे वाटप 7 मेपासूनच करण्यात येत आहे.पहिली ते आठवीच्या मराठी माध्यमाच्या 4 लाख 12 हजार 216, उर्दू माध्यमाच्या 7882, हिंदी माध्यमाच्या इयत्ता पाचवीतील 23, सहावी आणि सातवीमधील प्रत्येकी 32, आठवीतील 42 एकूण 129. नाशिक तालुक्यातील पहिली ते आठवीच्या तर निफाड तालुक्यातील पाचवी ते आठवीच्या इंग्रजी माध्यमाच्या 1267 विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके देण्यात येणार आहेत. पहिली ते सातवीच्या 68 हजार 228 विद्यार्थ्यांना एकात्मिक पुस्तके देण्यात येणार आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या