Sunday, April 28, 2024
HomeधुळेVideo तरुणांनी उभी केली नि:शुल्क रक्तदान चळवळ

Video तरुणांनी उभी केली नि:शुल्क रक्तदान चळवळ

धुळे । प्रतिनिधी Dhule

येथील तरुणांनी सामाजिक बांधिलकीतुन ‘श्री दीप रक्त सेवा ग्रुप’ माध्यमातून उभ्या केलेल्या रक्तदान चळवळीला पाहता पाहता 10 वर्ष झालीत. या कालावधीत त्यांनी गरजू रुग्णांना आतापर्यंत 6 ते 7 हजार रक्त बाटल्या दिल्या आहेत. कोणतेही शुल्क न घेता गरजू रुग्णांना सेवा देणाऱ्या तरुणांचा मोठा ग्रुप असून अहोरात्र त्यांची सेवा सुरू आहे

- Advertisement -

थॅलेसिमिया या आजाराच्या रुग्णांना सतत रक्ताची गरज भासते. अशा 150 मुलांना या ग्रुप ने दत्तक घेतले असून त्यांना दर 24- 25 दिवसात मोफत रक्त पुरवठा केला जातो. कोरोनाच्या संकटात मागील वर्षी या ग्रुपने 1329 बाटल्या उपलब्ध करून दिल्यात, तर यंदा आता पर्यंत साडे पाचशे बाटल्या गरजवंतांपर्यंत पोहचवल्या आहेत. कोणतीही सामाजिक , राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या या तरुणांच्या कार्याचा सुगन्ध आता राज्यभर पोहचला आहे. आज जागतिक रक्त दिनाच्या शुभेच्छा देतानाच रक्तदानासाठी इतरांनीही पुढे यावे, असे आवाहन या ग्रुपचे सदस्य कल्पेश दीपक शर्मा यांनी ‘ दैनिक देशदूत’ शी बोलताना केले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या