Tuesday, April 23, 2024
Homeनाशिकयुसुफिया फाउंडेशन तर्फे 20 बेडचे मोफत रुग्णालय सुरु

युसुफिया फाउंडेशन तर्फे 20 बेडचे मोफत रुग्णालय सुरु

जुने नाशिक | Nashik

नाशिक शहर व परिसरात मोठ्या प्रमाणात करोना रुग्ण आढळत आहेत, तर उपचारासाठी अनेकांना बेडदेखील मिळत नाही. अशा वातावरणात युसुफिया फाऊंडेशनने अशोका मार्ग येथे भव्य 20 बेडसह मोफत रुग्णालय सुरू केले आहे.

- Advertisement -

अशोका हॉस्पिटलचे डॉ. दिनेश वाघ यांच्या हस्ते नुकतेच त्याचे उद्घाटन झाले.

विशेष म्हणजे डॉ. वाघ यांच्यासह मालेगाव व इतर भागातील तज्ञ डॉक्टर रुग्णांवर उपचार करणार आहे. बगई बँकेट हॉल या संपूर्ण वातानुकूलित हॉलमध्ये हे सेंटर सुरू करण्यात आले आहेत.

या ठिकाणी सर्व प्रकारची औषधे, इंजेक्शनसह सलाईन देखील मोफत मिळणार आहे, नागरिकांनी या याचा लाभ घ्यावा, असे आवाहन फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष हाजी मुजाहिद शेख यांनी केले आहे.

जुने नाशिक परिसरात अशा रुग्णालयाची अत्यंत गरज होती, अशा वेळी युसुफिया फाउंडेशनने हे कार्य केल्यामुळे त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. जोपर्यंत करोना हद्दपार होत नाही तोपर्यंत रुग्णालय सुरूच राहणार असल्याची माहिती आयोजक इसमाईल शेख यांनी दिली.

डॉ. समीर शेख, डॉ. तोहीद अहमद, डॉ. शब्बीर अहमद, डॉ.रईस सिद्दीकी, डॉ. ओमीज शेख उपचार करणार आहे. हाजी मोबिन शेख, हुसैन शेख, इम्रान खान, राशीद खान परिश्रम घेत आहे.

एकीकडे खासगी व शासकीय रुग्णालयांमध्ये जागा शिल्लक नाही तर दुसरीकडे खासगी रुग्णालयांमध्ये लाखो रुपयांचे बिल होत आहे. अशा वातावरणात अत्यंत मोफत हे रुग्णालय सुरू करण्यात आल्यामुळे नागरिकांना चांगला दिलासा मिळाला आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या