Friday, April 26, 2024
Homeधुळेकांदा उत्पादक शेतकर्‍यांची 24 लाखात फसवणूक

कांदा उत्पादक शेतकर्‍यांची 24 लाखात फसवणूक

धुळे – Dhule – प्रतिनिधी :

शिरपूर तालुक्यातील कांदा उत्पादक शेतकर्‍यांकडून तब्बल चार हजार क्विंटल कांदा विकत घेवून त्याचे 24 लाख 50 हजार रूपये अदा न करता शेतकर्‍यांची फसवणुक केल्याचा प्रकार

- Advertisement -

उघडकीस आला आहे. याप्रकरणी जळगाव जिल्ह्यातील व्यापार्‍यासह दोघांवर शिरपूर शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत शेतकरी बाजीराव माधवराव भामरे (रा.तर्‍हाडी ता.शिरपूर) यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे. त्यानुसार सन 2018-19 मध्ये एप्रिल ते मे महिन्यादरम्यान शिरपूर तालुक्यातील तर्‍हाडीसह परिसरातील शेतकर्‍यांनी शेतात पिकवलेला कांदा विक्रीसाठी उपलब्ध केला होता.

त्यादरम्यान तर्‍हाडी गावातील अनिल सुभाष भामरे (वय 30) याने गोपाल नारायण माळी (वय 52 रा.लासुर ता. चोपडा जि.जळगाव) हा मोठा कांदा व्यापारी असल्याचे गावातील कांदा उत्पादक शेतकरी बाजीराव भामरे आणि इतरांना भासविले.

भामरे आणि इतर शेतकर्‍यांकडून तब्बल 4 हजार 198. 87 क्विंटल कांदा खरेदी केला. त्यापोटी शेतकर्‍यांना 24 लाख 50 हजार 22 रुपयांचा मोबदला अदा करणे आवश्यक होते.

मात्र विकत घेतलेल्या कांद्याचे पैसे शेतकर्‍यांना दिले नाही. शेतकरी बाजीराव भामरे आणि इतर शेतकर्‍यांनी व्यापारी गोपाल माळी आणि त्याचा साथीदार अनिल भामरे यांच्याकडे पैशासाठी तगादा लावला.

त्यामुळे दोघांनी शेतकर्‍यांना बँक खात्यातून पेमेंट देण्याचे सांगत धनादेश दिले. मात्र हे धनदेश बँकेत जमा केले असता व्यापार्‍याच्या खात्यात पैसे नसल्याने वटलेच नाहीत. तेव्हा पुन्हा शेतकर्‍यांनी दोघांकडे पैशाची मागणी केली असता त्यांनी तुमच्याकडून जे होईल ते करुन घ्या, अशी धमकी दिली.

अनिल भामरे व गोपाळ माळी या दोघांनी शेतकरी बाजीराव भामरे आणि इतर शेतकर्‍यांची आर्थिक फसवणुक केली. त्यानुसार दोघांवर शिरपूर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या