Friday, April 26, 2024
Homeनाशिकफ्लॅट करारनामा करून देतो असे सांगत साडे पंधरा लाखांची फसवणूक

फ्लॅट करारनामा करून देतो असे सांगत साडे पंधरा लाखांची फसवणूक

इंदिरानगर l Indira Nagar (वार्ताहर) :

ताबे गहाण करारनामा करून फ्लॅट देतो असे सांगून फ्लॅट न देता 15 लाख 50 हजार रुपयांची फसवणुकिचा प्रकार वडाळागावात घडला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जाकीर नूर मोहम्मद शेख (रा. घनकर गल्ली, नाशिक) यांचे नातेवाईक वडाळा गावात राहत असून त्यांना वडाळागावात भाडेतत्त्वावर घर घ्यायचे असल्याने ते तपास करीत होते.

- Advertisement -

त्यावेळी साजिद वली मोहम्मद शेख (50 बागवान पुरा, नाशिक) भेटले त्यांनी गावातील मदार अपार्टमेंट येथील ए/०१ टू बीएचके फ्लॅट दाखविला तो ३६ महिन्याच्या करारावर सात लाख रुपये किमतीवर ताबे गहाण घ्यायचा ठरला.

त्यानुसार जाकीर यांनी त्यांच्या मावशी शकीला करिम (रा. जय भवानी रोड, नाशिक) रोड आय सी आय सी बँक, नाशिकरोड चेक १९/११/२०१९ नोटरी करून अकबरी साजिद शेख व त्यांच्या पत्नी नावाने दिला ठरल्याप्रमाणे २३/११/२०१९ रोजी त्याचा ताबा घेण्यासाठी जाकीर गेले त्यामध्ये एक पाटकरी नावाची व्यक्ती राहत होती. त्यांची विचारपूस केली असता यापूर्वीच मी पाच लाख रुपये साजिद यांना देऊन ताबे गहाण घेतला आहे.

जाकीर यांनी तातडीने साजिद यांना विचारणा केली असता तुम्हाला दुसरा फ्लॅट देतो असे सांगून त्यांनी त्यांची बहीण रुबीला अख्तर सय्यद नाशिक यांना बोलावून फ्लॅट बी/०८ मदर अपार्टमेंट वडाळागाव हा दाखवून ५/१२/२०१९ रोजी ताब्यात देतो.

असे सांगून सदर फ्लॅट मधील भाडेकरूला एक लाख रुपये द्यायचे आहे ते तुम्ही दिल्यास फ्लॅट खाली होईल. यामुळे जाकीर यांनी एक लाख रुपये दिले फ्लॅटचे कागदपत्राची झेरॉक्स घेतली आणि पंधरा दिवसांनी ताबा घेण्यासाठी गेले असता संशयित आरोपी साजिद वली मोहम्मद शेख, अलबाज सादिक शेख ,अकबरी सादिक शेख, रुबीला अख्तर सय्यद, यांनी शिवीगाळ करीत पैसे देत नाही काय करायचे कर अशी धमकी दिली.

त्यामुळे जाकीर यांनी त्यांच्याविरुद्ध सहा लाख रुपये घेऊन फ्लॅट न दिल्याप्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. त्याचप्रमाणे या चारही संशयित आरोपींनी हनीफ बुरहान शेख, मोसिम मुस्ताक शेख, नव शादबी रज्जाक शेख यांच्याकडून साडेआठ लाख रुपये घेऊन‌ फ्लॅट देतो असे सांगून फ्लॅट व पैसे परत न दिल्याप्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात दोन्ही फिर्यादीच्या तक्रारीवरून चारही संशयित आरोपी विरुद्ध साडे पंधरा लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असुन पुढील तपास इंदिरानगर पोलिस ठाण्याचे व पो. नि. निलेश माईनकर यांच्या मार्गदर्शनाखाली स. पो. नि. राकेश भामरे करत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या