Saturday, April 27, 2024
Homeनाशिकनाशिकमधील १४ कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुका पुढे ढकलल्या

नाशिकमधील १४ कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुका पुढे ढकलल्या

नाशिक | प्रतिनिधी Nashik

नाशिक जिल्ह्यातील 14 कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या आहेत. (Agricultural Produce Market Committee) या निवडणुकांना तिसऱ्यांदा मुदतवाढ देण्यात आली आहे….(fourteen apmcs election postponed by three months)

- Advertisement -

ही मुदतवाढ पुढील तीन महिन्यांची असून आता बाजार समितीवरील संचालकांना 23 एप्रिल 2022 पर्यंत कामकाज बघता येणार आहे. दरम्यान, याकाळात मात्र, या संचालक मंडळाला धोरणात्मक निर्णय घेता येणार नाही असे आदेश नुकतेच सहकार आणि पणन मंत्रालयाने काढले आहे.

सहकारी सोसायट्यांच्या (Sahkari Society elections) निवडणुका घेण्याचे निर्देश न्यायालयाने एका निकालाच्या दरम्यान दिलेले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील बाजार समित्यांचा निवडणूक कार्यक्रम सहकारी निवडणूक प्राधिकरणाने रद्द केल्याचे समजते.

बाजार समितीच्या निवडणुकीआधी सहकारी सोसायट्यांच्या निवडणुका घेण्याचे आदेश न्यायालयाने दिले. तथापि, जिल्ह्यातील बाजार समित्यांचा निवडणूक कार्यक्रम तूर्तास पुढे ढकलला आहे.

या बाजारसमित्यांचा आहे समावेश

नाशिक, पिंपळगाव, लासलगाव, नांदगाव, मनमाड, येवला, चांदवड, देवळा, उमराणे, घोटी, कळवण, दिंडोरी, सिन्नर, मालेगाव व सुरगाणा

- Advertisment -

ताज्या बातम्या