Thursday, April 25, 2024
Homeमुख्य बातम्यानाशिकवर शोककळा; केळवे समुद्रकिनारी सहा मुलं बुडाली

नाशिकवर शोककळा; केळवे समुद्रकिनारी सहा मुलं बुडाली

पालघर | प्रतिनिधी Palghar

पालघर जिल्ह्यातील केळवे समुद्रकिनाऱ्यावर (Kelwe Beach Dist Palghar) सहा जण बुडाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. यापैकी दोघांना वाचविण्यात यश आले असून चौघांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत….(Four dies due to drowning in Kelwe beach)

- Advertisement -

समुद्रात पोहण्यासाठी दोन स्थानिक मुले बुडत होती. याचवेळी त्यांना वाचवण्यासाठी नाशिकच्या चारही तरुणांनी समुद्रात उड्या मारल्या. मात्र, अंदाज न आल्याने चौघेही बुडाली. यापैकी एकाला पोहता येत असल्याने तो बचावला. तर एका स्थानिक मुलाला वाचवण्यात यश आले असल्याची माहिती मिळते आहे.

पालघर जिल्ह्यातील प्रसिद्ध पर्यटन स्थळ (Tourist Place) असलेल्या केळवे समुद्रकिनाऱ्यावर नाशिकमधील एका महाविद्यालयातील कॉलेज तरुणांच्या एक ग्रुपने सहल आयोजित केली होती. यावेळी दोन स्थानिक लहान मुले पोहण्यासाठी समुद्राच्या पाण्यात उतरली होती. मात्र समुद्राला ओहोटी असल्याने ही मुले बुडू लागली.

नाशिकच्या या तरुणांचे लक्ष या मुलांकडे गेले त्यानंतर त्यांनी तात्काळ त्या लहान मुलांना वाचविण्यासाठी पाण्यात उड्या घेतल्या. मात्र, हे चौघेही पाण्यात बुडाले. या चौघांपैकी एक तरुण पोहणारा असल्यामुळे तो बचावला.

तर बुडणाऱ्या एका लहान मुलालाही वाचवण्यात यश आले आहे. स्थानिकांनी या मुलांचा शोध घेतला असता चारही मुलांचे मृतदेह पाण्याच्या बाहेर काढण्यात आले आहेत. बचावलेल्या दोघांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

मयतांमधील मुलांची नावे अशी

  • ओम विसपुते (नाशिक)

  • दीपक वडाकाते (नाशिक)

  • कृष्णा शेलार (नाशिक)

  • अथर्व नागरे (केळवे)

- Advertisment -

ताज्या बातम्या