Wednesday, May 8, 2024
Homeधुळेधुळ्यात थकबाकीमुळे चार व्यापारी गाळे सील

धुळ्यात थकबाकीमुळे चार व्यापारी गाळे सील

धुळे ।Dhule। प्रतिनिधी

शहरातील प्रबोधनकार ठाकरे संकुलातील (Prabodhankar Thackeray complex) मालमत्ता थकबाकीदार (Property arrears) गाळेधारकांवर (floor holders) महापालिकेच्या (Municipal Corporation) जप्ती पथकातर्फे आज कारवाई करण्यात आली. यावेळी एक लाख रुपयांपर्यंत थकबाकी असलेले चार गाळे सील (sealed) करण्यात आले.

- Advertisement -

महापालिकेतर्फे थकबाकीदारांवर कारवाई करण्यासाठी आयुक्त देविदास टेकाळे यांच्या मार्गदर्शनाखाली जप्ती पथक तयार करण्यात आले आहे. आज सकाळी या पथकाने प्रबोधनकार ठाकरे संकुलातील गाळा क्र. 31 गणेश रामविलास मुंदडा यांच्याकडे एक लाख पाच हजार 876 रुपये, नवकार ट्रॅव्हल्स (पाटील पिज्जा) गाळा नं. 33 यांच्याकडे 94 हजार 909 रुपये, विनोद होमराम केवलरमाणी गाळा नं. 34 यांच्याकडे 94 हजार 909 रुपये तर विनोद कुंदनानी गाळा नं. 35 यांच्याकडे 95 हजार 942 रुपये थकबाकी आहेे. त्यांना थकबाकीमुळे नोटीस बजावूनही कराचा भरणा न केल्याने महापालिकेच्या पथकाने आज गाळा क्र. 31, 33, 34 व 35 हे चार गाळे सील केले.

ही कारवाई वसूली निरीक्षक तथा जप्ती अधिकारी शिरीष जाधव, शरद नवले, प्रदीप पाटील, झिंगा कोळी, अशोक चौधरी यांच्या पथकाने केली. दरम्यान, ज्या मालमत्ताधारकांकडे मालमत्ता कराची थकबाकी असेल त्यांनी महापालिकेत येवून त्वरीत कराचा भरणा करून जप्तीची कारवाई टाळावी असे आवाहन यावेळी जप्ती अधिकारी शिरीष जाधव यांनी केले.

- Advertisment -

ताज्या बातम्या