Tuesday, April 23, 2024
Homeनाशिकगॅसच्या भडक्यात चौघे भाजले

गॅसच्या भडक्यात चौघे भाजले

नाशिक । Nashik

घरात स्वयंपाकाच्या गॅसची गळती होऊन उडालेल्या आगीच्या भडक्यात एकाच कुटुंबातील चौघे जण भाजल्याची घटना सोमवारी (दि.13) सकाळी घडली.

- Advertisement -

शहरातील काठेगल्ली परिसरातील बनकर चौक येथे घडली. अली अख्तर (50), रुबिना अख्तर (45), रमजान अख्तर (28), रुखसाना अख्तर (25) अशी या घटनेत भाजलेल्यांची नावे आहेत.

याबाबत सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार बनकर चौकातील शिवनेरी अपार्टमेंट लगत असलेल्या एका छोट्याशा घरातून धूर निघत असल्याचे काही नागरिकांच्या लक्षात आले. तसेच घरातून आरडाओरड सुरू झाल्या मुळे आग लागल्याचा संशय नागरिकांना बनवला घटनेची माहिती तत्काळ अग्निशमन दलाला देण्यात आली.

माहिती मिळताच शिंगाडा तलाव अग्निशमन मुख्यालयातील अग्निशामक दल घटनास्थळी पोहचले. अग्निशमन दलाच्या जवानांनी भाजलेल्या चौघांना सुरक्षित बाहेर काढत तात्काळ जिल्हा शासकीय रुग्णालयात हलविले. तसेच गॅस सिलिंडर, शेगडीवर पाण्याचा मारा करुन ते सर्वप्रथम घरातून बाहेर काढले.

सुमारे अर्धा तास या ठिकाणी शर्थीचे प्रयत्न करत आग विझविण्यास जवानांना यश आले. या दुर्घटनेत चौघे जण भाजल्याची माहिती अग्निशमन दलाच्या सूत्रांनी दिली आहे.जखमींना शासकीय रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.

अग्निशामक दलाचे लीडींग फायरमन शाम राऊत हे फायरमन किशोर पाटील, विजय शिंदे, राजेंद्र पवार, उदय शिर्के, बंबचालक शरद देटके यांनी ही आग आटोक्यात आणली.

- Advertisment -

ताज्या बातम्या