Thursday, April 25, 2024
Homeनाशिकसात महिन्यांत बिबट्यांच्या हल्ल्यात चार मृत्यू

सात महिन्यांत बिबट्यांच्या हल्ल्यात चार मृत्यू

नाशिक । प्रतिनिधी

दिनांक 2 मार्च पासून इगतपुरीत पुन्हा बिबट्याकडून माणसावर हल्ल्याच्या मालिका सुरू झाल्या आहेत. येथे अवघ्या 12 दिवसांच्या कालावधीत बिबट्याच्या हल्ल्यात तीन जण जखमी झाले आहेत. नोव्हेंबर महिन्यात दोन प्रौढ बिबट, एक नर व मादी यांना पकडल्यानंतर बिबट्याचे हल्ले पुन्हा सुरू झाले आहेत. इगतपुरीतील बिबट्यांना पकडण्यात वन विभाग अपयशी ठरल्याचे दिसून येत आहे.

- Advertisement -

मागील वर्षी ऑगस्टमध्ये सुरू झालेल्या बिबट्यांच्या हल्ल्यात दोन बिबटे पकडले जाईपर्यंत चार निष्पापांचा जीव गेला. परंतु, दुर्दैवाने, पुन्हा एकदा इगतपुरीमध्ये बिबट्याकडून मानव हल्ल्याची मालिका सुरू झाली आहे. 2 मार्च रोजी किरण डगळे नावाच्या मुलीवर बिबट्याने हल्ला केला. खेडभैरव गावात ही घटना घडली. तिच्या आजीच्या धाडसाने किरण बचावली.

13 मार्च रोजी अवडू सोमा आवाली नावाच्या शेतकर्‍यावर बिबट्याने हल्ला करून गंभीर जखमी केले. ठाकूरवाडी येथील खेडभैरव येथे ही घटना घडली. सलग दुसर्‍या दिवशी पंढरी घोडे नावाच्या आणखी एका शेतक्यावर बिबट्याने हल्ला केला. इगतपुरीत घडलेल्या या घटनांमध्ये नाशिक तालुक्यातील दारणा नदी पात्रात घडलेल्या घटनांशी साम्य आहे. परंतु अद्याप कोणताही दबाव निर्माण झाला नसल्याने वनविभाग हे गांभीर्याने घेत नाही, असा आरोप होत आहे. ज्या प्रकारे वनविभागाने त्यावेळी कार्यवाही केली तशी तत्परता इगतपुरीत दिसून येत नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

आम्ही बिबट्या हल्ल्याच्या क्षेत्रात जागरूकता मोहीम सुरू केली आहे. दवंडी देण्याचे काम सुरु आहे. टीम या भागात गस्त घालत आहे, लोकांना माहिती देत आहे. आतापर्यंत या ठिकाणी चार पिंजरे बसविण्यात आले आहेत. चार ट्रॅप कॅमेरे बसविण्यात आलेले आहेत. वनरक्षक देखील तैनात करण्यात आले आहेत. प्रत्येक पिंजरा वारंवार तपासण्याचे काम सुरु आहे.

-रमेश ढोमसे, वनपरिक्षेत्र अधिकारी, इगतपुरी.

- Advertisment -

ताज्या बातम्या