Thursday, April 25, 2024
Homeनाशिकमहाविद्यालयाच्या आठवणींना उजाळा; अमेरिका, ओमानहून विद्यार्थ्यांची हजेरी

महाविद्यालयाच्या आठवणींना उजाळा; अमेरिका, ओमानहून विद्यार्थ्यांची हजेरी

येवला | प्रतिनिधी | Yeola

विद्यार्थी कितीही मोठे झाले तरी आपली शाळा-महाविद्यालय आणि तेथील आठवणी नेहमी मनात घर करून असतात. याचा प्रत्यय बाभूळगाव (Babhulgaon) येथील एस. एन.डी. अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या (SND College of Engineering) माजी विद्यार्थी मेळाव्यात (Former Students farewell) आला. अमेरिका (America), ओमानहून (Oman) महाविद्यालयाच्या आठवणीत अभियंते रमलेले दिसून आले…

- Advertisement -

अभियांत्रिकी महाविद्यालय व संशोधन केंद्राचा पहिला ऑनलाईन माजी विद्यार्थी मेळावा उत्साहात पार पडला. मेळाव्याच्या निमित्ताने परत एकदा एकत्र आलेले सर्व माजी विद्यार्थी आठवणीत हरवून गेले होते.

मार्गदर्शन करताना प्राचार्य डॉ. पी. एम. पाटील (Dr. P. M. Patil) म्हणाले की, महाविद्यालयाचे विद्यार्थी वेगवेगळ्या क्षेत्रात काम करीत असून त्यांनी महाविद्यालयाचे नाव उज्ज्वल केले आहे. या मेळाव्याच्या आयोजनामुळे एक नवीन दिशा मिळणार आहे.

२०१० पासूनचे १२० हून अधिक माजी विद्यार्थी, विद्यार्थिनी आणि शिक्षकांनी मेळाव्यास आपुलकीने उपस्थिती दर्शवत महविद्यालयावरील आपले प्रेम व्यक्त केले.

अभिजित देसाई याने अमेरिकेतून, अक्षय आहिरे ओमानहून, अहमद इनामदार, मनोज गाडेकर, विकी गायकवाड, भाग्यश्री पाटील, गणेश मोरे आदी विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले.

शिक्षक आमदार किशोर दराडे (MLA Kishor Darade), संस्थेचे संचालक रुपेश दराडे (Rupesh Darade) यांनी शुभेच्छा दिल्या. आभार रोहन पांडव यांनी सर्वांचे मानले.

- Advertisment -

ताज्या बातम्या