Thursday, April 25, 2024
Homeमहाराष्ट्रपरमबीर सिंह यांची सर्वोच्च न्यायालयात याचिका

परमबीर सिंह यांची सर्वोच्च न्यायालयात याचिका

मुंबई | Mumbai

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या पत्रामुळे राज्यातील राजकारणात नाहीतर तर देशातील राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. या पत्राद्वारे सिंग यांनी अनिल देशमुखांवर पैसे वसुली करण्याचा आरोप केला आहे.

- Advertisement -

दरम्यान, मुख्यमंत्र्यांना दिलेल्या पत्रातील आरोपांची चौकशी व्हावी, या मागणीसाठी मुंबई पोलिसांचे माजी आयुक्त परमबीर सिंह यांनी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली आहे. परमबीर यांनी पत्रात लिहिलेल्या आरोपांची सखोल चौकशी करण्यासाठी याचिका दाखल केली आहे. एकूण १३० पानांची याचिका मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी दाखल केली आहे.

परमबीर सिंह यांनी याचिकेत म्हंटल आहे की, ‘गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या भ्रष्टाचाराबाबत मी केलेल्या तक्रारीची निप:क्ष, प्रभावहीन आणि कोणतीही बाजू न घेता चौकशी व्हावी. पुरावे नष्ट होण्यापूर्वी याची सतत्या तपासणे आवश्यक आहे.

अनिल देशमुखांनी फेब्रुवारी २०२१ मध्ये त्यांच्या निवासस्थानी सचिन वाझे आणि संजय पाटील यांच्यासोबत बैठक घेतली होती. या दोघांच्या वरिष्ठांना डावलून ही बैठक झाली होती. त्या बैठकीत महिन्याला १०० कोटी रुपये गोळा करण्याचं टार्गेत अनिल देशमुखांनी दिलं होतं. त्यापूर्वी २४ की २५ ऑगस्ट २०२० मध्ये, रश्मी शुक्ला, ज्या राज्य गुप्तचर यंत्रणेच्या आयुक्त आहेत, त्यांनीही पोलीस महासंचालकांना, पोस्टिंग किंवा बदलीमध्ये अनिल देशमुखांकडून भ्रष्टाचार होत असल्याचं सांगितलं होतं.

मात्र त्यावेळी याप्रकरणात अनिल देशमुखांवर कोणतीही कारवाई न करता उलट रश्मी शुक्लांनाच सुनावण्यात आलं होतं. मग गृहमंत्री अनिल देशमुख यांनी अनेक तपासामध्ये हस्तक्षेप करुन पोलीस अधिकाऱ्यांना आपल्याला हव्या तशा सूचना देत होते,’ असा उल्लेख परमबीर सिंग यांनी आपल्या याचिकेत केला आहे.

दरम्यान, राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन या प्रकरणावर मोठा खुलासा केला आहे. अनिल देशमुख यांच्यावर आरोप करताना परमबीर सिंह यांनी कोणते पोलीस अधिकारी देशमुख यांना कोणत्या दिवशी भेटले याची माहिती देखील दिली होती. सचिन वाझे, संजय पाटील हे अधिकारी गृहमंत्र्यांना भेटल्याचे त्यांनी सांगितले होते.

मात्र, सचिन वाझे आणि अनिल देशमुख यांच्या भेटीची जी तारीख त्यांनी पत्रात दिली त्यावेळी अनिल देशमुख रुग्णालयात होते, असे शरद पवार यांनी सांगितले. गृहमंत्री फेब्रुवारीच्या संबंध महिन्यात कोरोनामुळे रुग्णालय आणि नंतर होम आयसोलेशनमध्ये होते. मग देशमुखांनी सचिन वाझेंना बोलावून वसुलीचे आदेश दिले असे सिंग कशाच्या आधारावर म्हणतात? असा सवाल पवार यांनी केला.

पवारांकडून कागदपत्रे सादर

गृहमंत्री अनिल देशमुख या काळात रुग्णालयात असल्याचे कागदपत्रेही त्यांनी सादर केले. पवार म्हणाले, सिंग यांनी फेब्रुवारीच्या मध्यात वसुलीच्या सूचना देण्यात आल्याचे सांगितले होते. माझ्याकडे कागदपत्र आहेत. त्यावरून ५ ते १५ फेब्रुवारीपर्यंत अनील देशमुख हे कोरोनामुळे रुग्णालयात भरती होते. मी रुग्णालयातूनही ही माहिती घेतली आहे. देशमुख हॉस्पीटलमध्ये भरती असल्याचा रेकॉर्ड आहे आणि १५ ते २७ फेब्रुवारी पर्यंत होम कॉरेन्टाईनचा सल्ला डॉक्टरांचा होता. असे असताना सिंग कशाच्या आधारावर देशमुखांनी वाझेंना भेटून वसुलीचे आदेश दिल्याचे सांगत आहेत, असा सवाल पवारांनी केला.

पत्र लिहिण्यास महिनाभर का थांबले?

परबीरसिंह यांनी पत्र लिहिण्यास महिन्याभराचा कालावधी का घेतला? असा प्रश्न शरद पवार यांनी उपस्थित केला. परबीर यांच्या आरोपात तथ्य नसल्यामुळे अनिल देशमुख यांचा राजीनाम्याचा प्रश्नच येत नाही, असे शरद पवार यांनी सांगितले. सरकारच्या अस्थिरतेचा कोणात प्रश्न नसल्याचे त्यांनी सांगितले.

- Advertisment -

ताज्या बातम्या