Sunday, April 28, 2024
Homeमहाराष्ट्रमाजी खासदार संभाजीराव काकडे यांचे निधन

माजी खासदार संभाजीराव काकडे यांचे निधन

पुणे – भाजपाचे नेते व माजी खासदार संभाजीराव काकडे उर्फ लाला यांचे वृद्धपकाळाने आज सकाळी निधन झाले आहे. ते 90 वर्षांचे होते.

संभाजी काकडे हे महाराष्ट्राच्या राजकारणात ते राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे कट्टर विरोधक म्हणून ओळखले जात होते. बारामती मतदारसंघातून ते दोन वेळा लोकसभेवर निवडून गेले होते. 1978 व 1982 मध्ये ते खासदार होते. 1971मध्ये विधान परिषदेच्या माध्यमातून ते पहिल्यांदा आमदार झाले होते.

- Advertisement -

राजकारणाबरोबरच त्यांनी सहकार क्षेत्रातही भरीव योगदान दिलं आहे. सिंडिकेट काँग्रेस, जनता पक्ष तसंच, जनता दलाचे प्रदेशाध्यक्ष म्हणनही त्यांनी काम पाहिलं आहे. संभाजीराव यांनी अनेक कार्यकर्तेही घडवले आहेत. राज्यपातळीवर त्यांनी त्यांच्या कार्याचा ठसा उमटवला आहे.

शरद पवारांनी वाहिली श्रद्धांजली

माजी खासदार संभाजीराव काकडे यांच्या निधनानं बारामतीतील मातब्बर राजकीय व्यक्तित्व हरपले. जनता दलाचे ज्येष्ठ नेते म्हणून त्यांनी राज्याच्या राजकारणावर दीर्घकाळ प्रभाव टाकला. नव्या नेतृत्वाला दिशा देण्याचे कार्य निष्ठेने केले, अशा भावना शरद पवारांनी व्यक्त केल्या आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या