Thursday, April 25, 2024
Homeनगरहभप बंडातात्या कराडकर यांच्या अटकेच्या निषेधार्थ अकोलेत आंदोलन

हभप बंडातात्या कराडकर यांच्या अटकेच्या निषेधार्थ अकोलेत आंदोलन

अकोले | प्रतिनिधी

वारकरी संप्रदायाचे हभप बंडातात्या कराडकर (Bandatatya Karadkar) यांना पायी वारी करतांना अटक केल्याच्या निषेधार्थ भाजपचे अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री व माजी आमदार वैभवराव पिचड (BJP’s Scheduled Tribes Morcha National General Secretary and former MLA Vaibhavrao Pichad)….

- Advertisement -

यांच्या नेतृत्वाखाली भाजप व अध्यात्मिक आघाडी यांच्या वतीने कोल्हार घोटी रस्त्यावर (Kolhar-Ghoti Road) अकोले बाजार (Akole Bazaar) तळासमोर भर उन्हात ठिय्या आंदोलन सुरु झाले आहे. माजी आमदार वैभवराव पिचड (former MLA Vaibhavrao Pichad) हे स्वतः गळ्यात टाळ टाकून भजनात दंग झाले होते. रस्त्यावर दुतर्फा मोठ्या प्रमाणात वाहतूक ठप्प झाली होती.

नगरमध्ये आघाडी सरकारविरोधात घोषणाबाजी

आंदोलनात अकोले तालुका वारकरी संघटनेचे माजी अध्यक्ष दीपक महाराज देशमुख (Deepak Maharaj Deshmukh), भाजपचे जि प गटनेते जालिंदर वाकचौरे (Jalindar Wakchaure), पंचायत समितीच्या सभापती उर्मिला राउत (Panchayat Samiti chairperson Urmila Raut), उपसभापती दत्तात्रय देशमुख (Panchayat Samiti deputy chairperson Dattatraya Deshmukh), भाजपाचे तालुकाध्यक्ष सीताराम भांगरे (Sitaram भांगरे), महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष सोनालीताई नाईकवाड़ी (Sonalitai Naikwadi),आदिवासी मोर्चाचे जिल्हाध्यक्ष विजयराव भांगरे (Vijayrao Bhangare), शहराध्यक्ष सचिन शेटे (Sachin Shete), अकोले नगर पंचायतचे माजी उपनगराध्यक्ष बाळासाहेब वडजे (Balasaheb Vadje),माजी नगरसेवक परशुराम शेळके (Parshuram Shelke), युवा मोर्चाचे राहुल देशमुख (Rahul Deshmukh), एन टी सेल चे जिल्हाध्यक्ष विजय पवार (Vijay Pawar), ह्भप किरण महाराज शेटे (Kiran Maharaj Shete), हभप राजेन्द्र महाराज नवले (Rajendra Maharaj Nawale),आदि कार्यकर्ते सहभागी झाले आहेत.

दरम्यान आंदोलन सुरु असतांना यावेळी सायरन वाजवत रुग्नवाहिका (Ambulance) आल्याचे लक्षात येताच आंदोलक कार्यकर्त्यांनी रुग्नवाहिकेला वाट मोकळी करुन देऊन सामाजिक बांधीलकीचे दर्शन घडविले.

- Advertisment -

ताज्या बातम्या