Monday, April 29, 2024
Homeनगरमी भाजपामध्येच राहणार - माजी आ. कर्डिले

मी भाजपामध्येच राहणार – माजी आ. कर्डिले

उंबरे |वार्ताहर| Umbare

गेल्या काही दिवसांपासून माझ्या पक्ष बदलाच्या अफवा (Rumors) पसरविल्या जात आहेत. मात्र, आपण भाजप (BJP) मध्येच असून तेथेच राहणार असल्याची माहिती माजी आ.शिवाजीराव कर्डिले (Former MLA Shivajirao Kardile) यांनी दिली आहे.

- Advertisement -

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (Nationalist Congress) प्रवेश होणार असल्याच्या चर्चेचे खंडन करताना कर्डिले (Former MLA Shivajirao Kardile) यांनी सांगितले, गेल्या काही दिवसांपासून आपला लवकरच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (Nationalist Congress) प्रवेश होणार असल्याची चर्चा सुरू आहे. परंतु आपण याबाबत कोणत्याही नेत्यांना भेटलेलो नाही. तसेच कोणाशी कोणतीही चर्चा झालेली नाही. भाजपमध्ये (BJP) आपण खुश असून पक्ष बदल करण्याचा कोणताही विचार नाही.

विधानसभा निवडणुकीत (Assembly Elections) माझा पराभव झाला असला तरी सर्व कार्यकर्त्यांनी एकजुटीने पक्षाचे विचार व कार्य अखंडित पणे सुरू ठेवलेले आहे. मतदार संघातील जनतेच्या सुख-दुःखात, विविध प्रश्नात आपण नेहमीच सहभागी आहे. त्यामुळे कोणीही गैरसमज करून घेऊ नये. आपण भाजप सोडून इतर पक्षात प्रवेश करणार नाही. तर भाजपमध्येच राहणार आहे. होणार्‍या चर्चा निरर्थक व चुकीच्या आहेत, असेही माजी आ.शिवाजीराव कर्डिले (Former MLA Shivajirao Kardile) यांनी स्पष्ट केले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या