या आमदाराच्या मुलाच्या वाहनाला अपघात

jalgaon-digital
1 Min Read

धुळे । प्रतिनिधी Dhule

मुंबई – आग्रा महामार्गावर आज माजी आमदार अनिल गोटे यांचे पुत्र तेजस गोटे हे अपघातातून बालबाल बचावलेत,ही घटना….

आज दि.२४ रोजी दुपारी पावणे तीन वाजेच्या सुमारास घडली. तेजस गोटे हे नेहमीची कामे आटोपून मल्हार बागेतून घराकडे जात असताना महामार्गावर पांझरा नदीवरील पुलावर असलेल्या खड्ड्यात त्यांच्या कारचे पुढील चाक गेले अन टायर फुटला. त्याचवेळी बाजूने भरधाव वेगात जाणारा ट्रक या कारवर आदळणार तोच ट्रक चालकाने अतिशय संयम राखत नियंत्रण मिळविले.

यामुळे श्री.गोटे यांना कोणतीही इजा झाली नाही. कारचे काहीसे नुकसान झाले पण या घटनेतून सुखरूप वाचल्याचे त्यांनी समाधान मानले.

तर परमेश्वराची कृपा आणि वाडवडिलांची पुण्याई आडवी आली, अशी प्रतिक्रिया माजी आमदार श्री.गोटे यांनी सोशल मीडियावर व्यक्त केली आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *