माजी मंत्री शंकरराव कोल्हे यांच्या निधनाबद्दल राजकीय नेत्यांनी व्यक्त केला शोक

jalgaon-digital
3 Min Read

सहकार व शिक्षण क्षेत्रातील मार्गदर्शक हरपले – आ. डॉ. सुधीर तांबे

सहकारातून सर्व सामान्यांच्या जिवनात नवी पहाट फुलविताना शिक्षणातून समाजाचा विकास करण्याचे कार्य उच्चशिक्षित असलेल्या स्व. शंकरराव कोल्हे यांनी आयुष्यभर केले. त्यांनी सहावेळा कोपरगांव मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व केले असून संजीवनी शिक्षण संस्थेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी उच्च शिक्षणाची सुविधा निर्माण करुन दिली. नऊ वर्ष साई संस्थानचे उपाध्यक्ष म्हणून योगदानही दिले. आधुनिक विचारांची जाण असलेले माजीमंत्री शंकरराव कोल्हे यांच्या निधनाने सहकार व शिक्षण क्षेत्रातील ज्येष्ठ मार्गदर्शक हरपले असल्याची प्रतिक्रिया नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आ.डॉ.सुधीर तांबे यांनी व्यक्त केली.

ज्येष्ठ अभ्यासू मागदर्शक – सत्यजीत तांबे

जुन्याकाळात बीएससी अ‍ॅग्री झालेल्या कोल्हे साहेबांनी येसगांवचे सरपंच ते मंत्री या राजकीय प्रवासाबरोबर आधुनिक विचारातून सहकार व शिक्षण क्षेत्रात बहुमोल योगदान दिले आहे. त्यांच्या निधनाने ज्येष्ठ अभ्यासू मार्गदर्शक हरपले असल्याची भावना महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजीत तांबे यांनी व्यक्त केली आहे.

सहकाराची मोठी हानी – माजी खा. प्रसादराव तनपुरे

साखर व्यवसायातील प्रचंड व ज्ञानी व्यक्तीमत्व असलेले ज्येष्ठनेते स्व. शंकरराव कोल्हे हे काळाच्या पडद्याआड गेले आहेत. त्यांच्या निधनाने सहकाराची मोठी हानी झाली असल्याची भावना माजी खासदार व राष्ट्रवादीचे ज्येष्ठनेते प्रसादराव तनपुरे यांनी व्यक्त केली.

माजी मंत्री कोल्हे यांच्यामुळे संजीवनी उद्योग समुहाची मान उंचावली – आ. राधाकृष्ण विखे पाटील

माजी मंत्री शंकरराव कोल्हे यांनी आयुष्य भर सहकार चळवळीची पाठराखण केली. शिक्षण, पाणी, संजीवनी उद्योग समूहाला सक्षम नेतृत्व दिले. त्यामुळे महाराष्ट्रात संजीवनी उद्योग समुहाची मान उंचावली आहे.

माजी मंत्री कोल्हे यांनी तालुक्याला वेगळी ओळख करून दिली – आ. आशुतोष काळे

निधनाची वार्ता जमजताच धक्का बसला. महाराष्ट्रात कोपरगाव तालुक्याला वेगळी ओळख माजी मंत्री शंकरराव कोल्हे व कर्मवीर शंकरराव काळे यांनी करून दिली.

शंकरराव कोल्हे हे सहकार क्षेत्रातील एक अग्रगण्य नाव होेते – माजी मंत्री राम शिंदे

माजी मंत्री शंकरराव कोल्हे हे एक सहकार क्षेत्रासह महाराष्ट्रातील एक अग्रगण्य नाव आहे. त्यांनी शेतकर्‍यांच्या हितासाठी धंदे व उद्योग उभे केले. आणि मोठ्या प्रमाणे शेतकर्‍यांना दिलासा देण्याचे काम त्यांनी त्यांच्या जिवनामध्ये केले. महाराष्ट्राच्या राजकारणात देखील त्यांनी असा एक चांगले पध्दतीने नेतृत्व केले. त्यांना दुरदृष्टीकोन होता असे आपल्यातुन माजी मंत्री शंकरराव कोल्हे निघुन गेले. नगर जिल्हयातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात त्यांची एक वेगळीच ओळख होती. अशा नेत्याला भारतीय जनता पार्टीच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *