Thursday, April 25, 2024
Homeजळगावखडसेंना महावितरणचा ‘शॉक ’ : घराचे बिल लाखभर

खडसेंना महावितरणचा ‘शॉक ’ : घराचे बिल लाखभर

मुक्ताईनगर – प्रतिनिधी Muktainagar

माजीमंत्री भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे Eknath Khadse यांना महावितरणने एक लाखाचं वीज बिल पाठवल्याने एकनाथ खडसे संतापले असून नागरिकांना येणाऱ्या भरमसाठ वीज बिलावर तोडगा काढण्यासाठी राज्यसरकारने हस्तक्षेप करावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.

- Advertisement -

श्री.खडसे यांचे मुक्ताईनगरमध्ये घर आहे. महावितरणने एप्रिल ते जुलै या महिन्याचं १ लाख ४ हजार रुपये वीज बिल पाठवले असून, प्रचंड प्रमाणात बिल आल्याने खडसे चांगलेच संतापले आहे.

महावितरणने मला प्रचंड बिल पाठवलं आहे. सर्वसामान्य लोकांनाही अव्वाच्या सव्वा बिल पाठवलं आहे. महावितरणने भरमसाठ बिल पाठवून सामान्य नागरिकांना वेठीस धरू नये. राज्य सरकारने या प्रकरणात तातडीने लक्ष घालावं आणि सामान्यांना वेठीस धरू नये. राज्य सरकारने याप्रकरणात ग्राहकांना सवलत द्यावी, अशी मागणी खडसे यांनी केली आहे.

लॉकडाउन आणी उकाडा वाढत गेला, त्यामुळं सगळेच लोक घरात होते. साहजिकच एप्रिल व मे महिन्यात विजेचा वापर मोठ्या प्रमाणावर वाढला. ३१ मे नंतर लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर वीज कंपन्यांनी पूर्वीप्रमाणे मीटर वाचन सुरू केले. त्यानुसार पाठवलेले बिल हे एप्रिल व मे महिन्यातील प्रत्यक्ष वीज वापरावर आधारीत होते. तो आकडा आधीच्या तुलनेत मोठा होता. त्यामुळे ग्राहकांना आता ‘शॉक’ बसला आहे. राज्य शासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे असल्याचे माजी मंत्री खडसे म्हणाले.

- Advertisment -

ताज्या बातम्या