Friday, April 26, 2024
Homeजळगावमाजी सदस्य शेखर पाटील यांनी यावल पंचायत समितीच्या कारभाराचे काढले वाभाडे

माजी सदस्य शेखर पाटील यांनी यावल पंचायत समितीच्या कारभाराचे काढले वाभाडे

 यावल Yaval प्रतिनिधी

गेल्या पाच वर्षात विरोधात झालेल्या ठरावांची कुठलीही चौकशी (ठरावांची कुठलीही चौकशी) यावल पंचायत समिती प्रशासनाने (Yaval Panchayat Samiti administration) केली नाही त्यामुळे मोठा भ्रष्टाचार (Big corruption) झाला असून यावल पंचायत समितीच्या कारभाराची वरिष्ठ स्तरावर चौकशी (Inquiry at senior level) न झाल्यास वेळप्रसंगी आमरण उपोषण (Fasting to death)केले जाईल असा गर्भित इशारा यावल पंचायत समितीचे काँग्रेसचे माजी गटनेता शेखर सोपान पाटील (Former member Shekhar Patil) यांनी पत्रकार परिषदेत केला.

- Advertisement -

गेल्या पाच वर्षात पाच सहा वेळी गटविकास अधिकारी हे प्रशासक म्हणून आलेत तेव्हा नवीन प्रभारी गटविकास अधिकारी यांना अभ्यास करायला वेळ लागत होता सध्या काही माहिती विचारणा केली तर अधिकारी वर्ग भिशी सुरू आहे, मिटींगला जायचे आहे, साइटवर जायचे आहे असे उडवा आवडीचे उत्तर देतात. ग्रामसेवक गावी राहत नाही फक्त विकास कामांची बिल काढण्यासाठी एक दोन तास सापडतात. सफाई कामगार, ग्रामपंचायत कर्मचारी यांचे पगार मिळत नाही. ग्रामसेवकांचा मात्र शासनाचा पगार सुरूच आहे. ग्रामसेवक वसुलीकडे दुर्लक्ष करतात ग्रामसेवक किती वेळ काम करतो याचा लेखाजोखा गटविकास अधिकारी यांनी द्यायला हवा.

बांधकाम विभागाचे इंजिनिअर कामावर जात नाही पंधराव्या वित्त आयोगाची काम पूर्ण करण्यासाठी अधिकाऱ्यांच्या घरी एमबी रेकॉर्ड करायला जावे लागते अशी तालुक्याची दयनीय स्थिती आहे.

दलित वस्ती व पंतप्रधान मोदी यांच्या स्वच्छ भारत मिशन या डिपार्टमेंटचे काम म्हणजे भ्रष्टाचार सुरू असून त्यातील भ्रष्टाचाराची स्वच्छता करण्यासाठी अधिकाऱ्यांनी लक्ष घालण्याची गरज आहे .ज्या शौचालय बांधण्यात आलीत त्यात कोणीही जात नाही शासनाचा पैसा पाण्यात जात असून ठेकेदारांना इंजिनियर दिसतात. मात्र ग्राहकांना व नागरिकांना इंजिनियर सापडत नाहीत. इस्टिमेट माहिती राहत नाही. तक्रारी करून ही चौकशी होत नाही .पाच वर्षात झालेल्या  बांधकामांची चौकशी व्हायला हवी.

शबरी घरकुल याद्यांची माहिती पंचायत समिती सभापतीसह सदस्यांना दिली गेली नव्हती. तत्कालीन प्रभारी गटविकास अधिकारी, आयएएस अधिकारी व संपूर्ण यंत्रणेने ग्राहकांकडून पाच ते दहा हजार रुपये घेऊन शबरी घरकुल मंजूर करण्यात आले. तर शंभर ते पाचशे रुपये घेऊन साइटवर न जाता जिओ ट्रॅकिंग जागेवर न जाता करण्यात येत असतात घरकुलांमध्ये एक लाख 27 हजार रुपये जे शासनाचे अनुदान मिळते त्यातही चेक काढण्यासाठी अधिकारी पैसे घेतात. एमआरजीएस मार्फत झाड लागवड हा पार्ट अतिरिक्त गटविकास अधिकारी किंवा पंचायत समिती विस्तार अधिकारी गटविकास अधिकारी हेच पूर्ण मालक असतात नेमके किती झाडे लागवड झाली याची चौकशी न करता स्वतःचा आर्थिक लाभ त्यांनी करून घेतलेला आहे.

मोबाईलने केला घात : भरधाव ट्रक झाडावर आदळून चालक झाला ठार

गोठ्यांच्या कामात यावल तालुक्यात मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झालेला असून अनेकांनी गोठे न बांधता दुसऱ्याच्या जागी जिओ ट्रेकिंग करून पैसा काढून घेतलेला आहे तक्रारी करूनही एकही तक्रार लयास गेली नाही गटविकास अधिकाऱ्याचा चार्ज सात वर्षात एका सहाय्यक गटविकास अधिकाऱ्याच्या अवतीभोवती फिरत असताना दिसतो याला कोणाचा आशीर्वाद आहे?

आदिवासी क्षेत्रातील ओटीएसपी टीएसपी विहीर दुरुस्ती व मोटार बसवणे त्यात 67 लाभार्थ्यांनी खर्च केलेला आहे मात्र शासनाच्या अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे त्यांना आतापर्यंत पैसा मिळालेला नाही तर महिला बालविकास प्रकल्प अधिकारी विभागात मोठ्या प्रमाणावर अपहार झालेला आहे याची नोव्हेंबर 2021 मध्ये मासिक सभेत चर्चा झाली होती व प्रोसिडिंगलाही घेण्यात आले होते.

पत्नीचा खून करणार्‍या पतीस जन्मठेप

मात्र त्याची साधी चौकशी करण्यात आलेली नाही म्हणजेच अधिकारी वर्ग किती मंगरू र झालेले आहेत हे यावरून दिसते कामांचे चेक काढताना अंगणवाडी सेविका यांच्याकडून पैसे मागणी होते तक्रार केल्यास त्यांच्यावर येथील अधिकारी व क्लार्क हे सूडबुद्धीने काम करतात या प्रकल्पात कोट्यावधीचे अनुदान येते याची होते त्यात त्यांची पोटपूजा झाल्याशिवाय अनुदान विस्तारित होत नाही.

ग्रामविकास मंत्रालय पर्यंत तक्रारी करूनही चौकशी झालेली नाही पंचायत समितीतील अशा विविध प्रश्नांचे अनेक प्रश्न तारांकित पेंडिंग आहेत कोरोनामुळे विधान भवन चाललेले नव्हते प्रशासनाच्या कितीही तक्रारी केल्या तरी निगरगटप्रमाणे अधिकारी वर्ग काम करतात सुट्टी न घेता परस्पर अधिकारी रजेवर राहतात असे अनेक आरोप शेखर सोपान पाटील यांनी आयोजित पत्रकार परिषदेत केले

वरील सर्व आरोपांची त्वरित चौकशी न झाल्यास वेळप्रसंगी आमरण उपोषणाचा इशारा त्यांनी दिला असून खरंच जिल्हा परिषद प्रशासन व यावल पंचायत समिती प्रशासन आता याकडे लक्ष घालेल का.? याकडे लक्ष लागले आहे

रामदेववाडीजवळ चारचाकीची दुचाकीला धडकयावल तालुक्यात आठ ग्रामपंचायतीच्या निवडणूकांचा वाजला बिगुल

प्रभारी गटविकास अधिकारी एकनाथ चौधरी यांच्याशी संबंधित आरोपाच्या संदर्भात संपर्क साधला असता मी सुद्धा प्रभारी आहे माझ्याकडे ज्या ज्या तक्रारी माझ्यासमोर आल्यात त्याचे निरसन करणे सुरू आहे उर्वरित राहिलेले ज्या तक्रारी असतील त्याचा निपटारा लवकरात लवकर करण्यात येईल व ज्याची चुकी असेल त्याची गय केली जाणार नाही असे त्यांनी स्पष्ट केले

ग्रामरोजगार सेवकाचा पंचायत समिती आवारात आत्मदहनाचा प्रयत्न

 ई टेंडर नोटीस तयार करताना यावल तालुक्यातील एका खाजगी इंजिनियर कडून मर्जीप्रमाणे जाहिराती तयार करून मर्जीतील वृत्तपत्रांना परस्पर जाहिराती दिल्या जातात आणि अवास्तव बिल या ई टेंडर चे ग्रामपंचायत मध्ये टाकण्यात येते.

त्यामुळे मोठा भ्रष्टाचार होत असल्याचं यासंदर्भात एकनाथ चौधरी यांच्याशी चर्चा केली असता या संदर्भात उद्याच पत्र काढून कोणत्याही ग्रामपंचायतने परस्पर ई टेंडर न काढता यावल पंचायत समिती मधूनच किंवा एखाद्या तज्ञ ग्रामसेवकाकडून तयार करून टेंडर काढण्यात येतील असे सूचना लेखी देऊ असे आश्वासित केले.

केळी पिकाच्या रोपावर मोठ्या प्रमाणात सीएमव्ही चा प्रादुभाव

- Advertisment -

ताज्या बातम्या