Friday, April 26, 2024
Homeक्रीडाYashpal Sharma : भारताला पहिला विश्वचषक जिंकून देणाऱ्या संघातील खेळाडू यशपाल शर्मा...

Yashpal Sharma : भारताला पहिला विश्वचषक जिंकून देणाऱ्या संघातील खेळाडू यशपाल शर्मा यांचे निधन

दिल्ली | Delhi

माजी भारतीय क्रिकेटपटू यशपाल शर्मा यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. वयाच्या ६६व्या वर्षी यशपाल शर्मा यांनी अखेरचा श्वास घेतला.

- Advertisement -

१९८३च्या क्रिकेट विश्वचषक विजेत्या भारतीय संघाचे यशपाल शर्मा सदस्य होते. भारतीय निवड समिती सदस्य म्हणूनही शर्मा यांनी जबाबदारी पार पाडली आहे.

या विश्वचषकातील वेस्ट इंडिजविरुद्धच्या सामन्यात त्यांनी ८९ धावांची खेळी करत संघाला पहिला विजय मिळवून देण्यात मोलाचे योगदान दिले होते.

शर्मा यांनी भारतीय क्रिकेट संघाकडून ३७ कसोटीत ३३.४५च्या सरासरीने १ हजार ६०६ धावा केल्या. १४० ही त्यांची सर्वोत्तम धावसंख्या होती.

तर वनडेमध्ये ४२ सामन्यात त्यांनी देशाचे प्रतिनिधत्व केले. वनडेत शर्मा यांनी २८.४८च्या सरासरीने ८८३ धावा केल्या.

- Advertisment -

ताज्या बातम्या