Saturday, April 27, 2024
Homeराजकीयगुजरातचे माजी मुख्यमंत्री केशुभाई पटेल यांचे निधन

गुजरातचे माजी मुख्यमंत्री केशुभाई पटेल यांचे निधन

अहमदाबाद | Ahmedabad

गुजरातचे माजी मुख्यमंत्री केशुभाई पटेल (Keshubhai Patel) यांचे निधन झाले आहे. केशुभाई पटेल हे 92 वर्षीय होते. महिन्याभरापूर्वी त्यांना करोनाची लागण झाली होती. मात्र त्यांनी करोनावर अगदी यशस्वी मात केली होती.

- Advertisement -

दरम्यान आज (29 ऑक्टोबर) दिवशी सकाळी श्वसनाला त्रास जाणवू लागला. दरम्यान त्रास होत असल्याच्या तक्रारीनंतर त्यांना अहमदाबाद येथील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला आहे.

गुजरातच्या राजकीय पटलावरील केशुभाई पटेल हे एक महत्त्वाचे नेते होते. त्यांनी गुजरात राज्याचे दोन वेळेस मुख्यमंत्री पद भुषवले आहे. १९९५ आणि १९९८ मध्ये ते मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले होते. दोन्ही वेळा त्यांना आपला पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करता आला नव्हता. गुजरातच्या ज्येष्ठ भाजप नेत्यांमध्ये त्यांचा समावेश होता. मात्र 2012 साली त्यांनी भारतीय जनता पक्षाचा राजीनामा दिला. पक्षात्यागानंतर त्यांनी गुजरात परिवर्तन पार्टी हा स्वतःचा नवा पक्ष सुरू केला होता. 2012 च्या गुजरात विधानसभा निवडणूकीत ते विसावदर विधानसभा मतदार संघातून विजयी झाले होते. मात्र दोन वर्षातच प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांना राजीनामा द्यावा लागला.

- Advertisment -

ताज्या बातम्या