माजी मुख्यमंत्र्यांची काँग्रेसला सोडचिठ्ठी

jalgaon-digital
1 Min Read

गोवा | Goa

गोव्यात विधानसभा निवडणुका तोंडावर असून या घडामोडीमुळे राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. दरम्यान आगामी विधानसभा निवडणुका तोंडावर काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे.

धर्मांतराचे जाळे : नाशिकमधील कुणाल असा झाला आतिफ

माजी मुख्यमंत्री तथा ज्येष्ठ नेते लुईझिन फालेरो (Luizinho Faleiro) यांनी आपल्या आमदारपदाचा राजीनामा सभापती राजेश पाटणेकर यांच्याकडे सोमवारी सकाळी सुपूर्द केला. त्यांनी म्हटलं की, मी नावेलिममध्ये माझ्या समर्थकांशी चर्चा केली. ते माझे कुटुंब आहेत आणि माझी नवी सुरुवात करण्याआधी त्यांचा आशीर्वाद महत्त्वाचा होता. माझं वय झालं असलं तरी रक्त अजुनही तरुण आहे. गोव्याला त्रासातून मुक्त करूया आणि गोव्यात नवीन सकाळ आणूया असं आवाहनही त्यांनी ट्विटरवरून केलं आहे.

२०१७ च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे १७ आमदार निवडून आले होते. विधानसभेत काँग्रेस सर्वात मोठा पक्ष होता. कालांतराने काग्रेसला गळती लागली. जुलै २०१९ मध्ये दहा काँग्रेसी आमदार फुटून भाजपवासी झाले. त्याआधी दोघे फुटले होते. काँंग्रेसकडे केवळ पाच आमदार शिल्लक राहिले होते. लुइझिन यांनी राजीनामा दिल्याने आता पक्षाकडे केवळ चार आमदार बाकी राहिले आहेत. ४० सदस्यीय गोवा विधानसभेत भाजपकडे २७, अपक्ष ३, काँग्रेसकडे ४, राष्ट्रवादी आणि मगोपकडे प्रत्येकी १ आणि गोवा फॉरवर्डकडे ३ आमदार आहेत. लुइझिन यांच्या राजीनाम्यामुळे एक जागा रिकामी झाली आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *