Friday, April 26, 2024
Homeनाशिकमाजी उपमहापौर बग्गा यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

माजी उपमहापौर बग्गा यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

नाशिक । प्रतिनिधी Nashik

नाशिकचे माजी उपमहापौर Former Deputy Mayor of Nashik गुरूमित बग्गा Gurmit Bagga यांनी अपक्ष नगरसेवकपदाचा राजीनामा दिल्यानंतर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत मुंबईत शुक्रवारी (दि.२८) काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश joined Congress party केला.

- Advertisement -

बग्गा यांच्या प्रवेशामुळे नाशिकमधील काँग्रेसचे पक्ष संघटन वाढण्यास मदत होणार आहे.बग्गा यांच्यावर लवकरच नवीन जबाबदारी टाकण्यात येणार आहे. त्यामुळे बग्गा यांनी कामाला लागावे,असे प्रदेशाध्यक्ष पटोले यांनी प्रवेश सोहळ्यात बोलताना सांगितले.यामुळे नाशिक शहर काँग्रेस शहराध्यक्षपदाची जबाबदारी बग्गा यांच्यावर सोपविली जाणार असल्याचे बोलले जात आहे.

काँग्रेसचे निष्ठावान असलेल्या बग्गा यांना महापालिकेच्या सन २०१२ मध्ये झालेल्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाने नगरसेवक पदाची उमेदवारी नाकारल्या नंतर बग्गा यांनी बंडखोरी करत अपक्ष निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत त्यांनी विजय मिळवला.त्यानंतर पुन्हा २०१७ च्या निवडणुकीतही ते अपक्ष म्हणून निवडून आले. मात्र, आता २०२२ मध्ये होत असलेल्या महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी स्वगृही म्हणजेच काँग्रेसमध्ये परतण्याचा निर्णय घेतला आहे.

पक्षांतर बंदीच्या कायद्यामुळे सध्याचे नगरसेवक पद कायम ठेवून त्यांना पक्षप्रवेश करणे शक्य नसल्याने, बग्गा यांनी बुधवारी नगरसेवक पदाचा राजीनामा आयुक्तांकडे सादर केला. त्यानंतर गुरूवारी बग्गा यांनी मुंबईत प्रदेशाध्यक्ष नाना पटोले,महसूल मंत्री बाळासाहेब थोरात,माजी मंत्री शिवाजीराव मोघे, प्रदेश उपाध्यक्ष मोहन जोशी, सरचिटणीस व मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे, इंटकचे जयप्रकाश छाजेड यांच्या उपस्थित काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

नाशिक शहर प्रभारी अध्यक्ष पदाची आठ वषार्पासून शरद आहेर यांच्याकडे धुरा आहे. दरम्यानच्या काळात काँग्रेस पुर्णत: गटातटात विभागली गेली आहे. यामुळे शहरात नेतृत्व बदलाबाबत अनेकदा चर्चा झाली. परंतू, अतंर्गत गटबाजीमुळे शहराध्यक्षपदाचा तिढा सुटत नव्हता. गत दोन महिन्यांपासून बग्गा यांच्या पक्ष प्रवेशाची चर्चा पक्षातंर्गत होती. बग्गा यांच्यावर शहराध्यक्षपदाची जबाबदारी सोपविली जाणार अशी अनेकदा चर्चा झाली. अखेर, बग्गा यांनी पक्ष प्रवेश केला. त्यामुळे शहराध्यक्षपद निवडीचा मार्ग खुला झाला आहे. बग्गा यांच्याकडे शहराध्यक्षपदाची धुरा देण्याची तयारी पक्षाने सुरू केली आहे. त्यामुळे आठवडाभरात बग्गांवर शहराध्यक्षपदाची जबाबदारी येण्याची शक्यता आहे.

प्रवेश सोहळयालाही गटबाजीचे ग्रहण

बग्गा यांच्या पक्ष प्रवेश होणार असे वृत्त आल्यानंतर महिनाभरापासून पक्षातंर्गत गटबाजी सुरू झाली आहे. बग्गा यांच्या प्रवेशातही शहरातंर्गत असलेली गटबाजी प्रकर्षाने दिसून आली. बग्गा यांनी काँग्रेस प्रवेशावेळी छाजेड यांनी हजेरी लावल्याने नगरसेवकांसह काही पदाधीकार्यांनी खुली नाराजी व्यक्त केली आहे.

तर प्रभारी शहराध्यक्ष शरद आहेर यांनी देखील या प्रवेश सोहळ्यापासून अंतर राखल्याची चर्चा पक्षातंर्गत आहे. प्रवेशासाठी अनेक पदाधिकारी मुंबईत दाखल झाले.मात्र, अनेकांनी प्रवेश सोहळयास दांडी मारल्याचे सांगण्यात येत आहे. बग्गा यांचा थेट छाजेंडांशी संबध जोडून आता काँग्रेस पक्षात छाजेडांची लुडबुड होणार असल्यामुळे एका गटाने पुन्हा नाराजी व्यक्त करत छाजेड विरोधी गट स्थापन करण्याच्या हालचाली सुरू केल्याची चर्चा आहे.

काही कारणास्तव मी काँग्रेसपासून दूर गेलो होतो. मी काँग्रेसच्या विचारधारेशी बांधील असल्यामुळे पुन्हा काँग्रेसमध्ये प्रवेश घेतला आहे.येत्या महापालिका निवडणुकीत जास्तीत जास्त नगरसेवक निवडून आणण्यासाठी मी यापुढे प्रयत्न करणार आहे.

गुरूमीत बग्गा (माजी महापौर)

- Advertisment -

ताज्या बातम्या