Friday, April 26, 2024
Homeजळगावग.स.सोसायटीचे माजी चेअरमन विलास नेरकर निलंबित

ग.स.सोसायटीचे माजी चेअरमन विलास नेरकर निलंबित

जळगाव – Jalgaon – प्रतिनिधी :

येथील ग.स.सोसायटीमधील लिपीक विजय पाटील यांचे नियमित वेतनश्रेणीच्या आदेशावर संशयित आरोपी विलास नेरकर यांनी ग.स.चे माजी अध्यक्ष असतानासुद्धा व तत्कालीन व्यवस्थापक संशयित आरोपी संजय ठाकरे यांनी आपसात संगनमत करुन त्या आदेशावर बनावट सही केल्याप्रकरणी त्यावेळचे ग.स.अध्यक्ष मनोज पाटील यांच्या तक्रारीवरुन विलास नेरकर यांच्याविरुद्ध शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

- Advertisement -

या प्रकरणाच्या चौकाशीअंती दोषी आढळून आल्याने माजी चेअरमन तथा मळगाव शाळेचे उपशिक्षक विलास यादवराव नेरकर यांना निलंबित करण्याचे आदेश भडगाव पंचायत समितीचे गटविकास अधिकारी रमेश वाघ यांनी आज बजावले आहेत.

ग.स.सोसायटीचे माजी अध्यक्ष मनोज पाटील हे विद्यमान अध्यक्ष असताना संशयित आरोपी विलास नेरकर यांनी ग.स.चे माजी अध्यक्ष असतानासुद्धा व तत्कालीन व्यवस्थापक संशयित आरोपी संजय ठाकरे या दोघांंनी आपसात संगनमत करुन स्वत:च्या फायद्यासाठी जळगाव ग.स.सोसायटीमधील लिपीक विजय पाटील यांचे नियमित वेतनश्रेणीच्या आदेशावर बनावट सही केली होती.

तसेच विद्यमान अध्यक्ष मनोज पाटील यांच्या अधिकाराचा गैरवापर केल्याप्रकरणी विलास नेरकर व संजय ठाकरे या दोघांंविरुध्द शहर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल झाल्यापासून संशयित आरोपी विलास नेरकर हे फरार आहेत.

प्राथमिक शिक्षणाधिकार्‍यांच्या पत्रांन्वये विलास नेरकर यांची चौकशी करुन कार्यवाहीचा आदेश शिक्षण विभागाला सादर करण्याचे आदेश दिले होते. त्यावरुन भडगाव पं.स.चे गटविकास अधिकार्‍यांनी नेरकर यांची या गैरवर्तणूक व बेजबाबदारपणाच्या वर्तणुकीबाबत महाराष्ट्र जिल्हा परिषद सेवा नियम 1964 नुसार भंग केल्याप्रकरणी शिक्षेस पात्र असून नेरकर यांच्यावर निलंबनाचे आदेश बजावण्यात आले आहे.

अहवाल प्राथमिक शिक्षणाधिकारी, जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी यांना सादर करण्यात आल्याचे गट विकास अधिकारी रमेश वाघ यांनी आदेशात म्हटले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या