Thursday, April 25, 2024
Homeनगर'चौकशीत होणार दूध का दूध, पाणी का पाणी'

‘चौकशीत होणार दूध का दूध, पाणी का पाणी’

पारनेर | तालुका प्रतिनिधी

भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी आज पारनेर (Parner) साखर कारखान्याला भेट दिली. यावेळी त्यांनी तेथे कामगार आणि शेतकऱ्यांशी संवाद साधला.

- Advertisement -

पारनेर सहकारी साखर कारखान्यात घोटाळा झाला असेल तर त्या पैशांचा हिशोब देऊन ते पैसे शेतकरी व कामगारांच्या खात्यांवर जमा झाले पाहिजेत. न्यायालयाने चौकशी आदेश दिले आहेत. परंतु भिती दाखवून शेतकर्‍यांच्या जमिनी हडप होणार असेल तर त्यांना सोडणार नाही. गरीब शेतकरी व कामगारांसाठी मी येथे आलो असल्याचे भाजप नेते माजी खा. किरीट सोमय्या यांनी सांगत चौकशीतून दूध का दूध आणि पाणी का पाणी होणार असल्याचे म्हणाले. दरम्यान पारनेर सहकारी साखर कारखाना कामगारांशी त्यांनी संवाद साधत कारखाना बंद पडणार नसल्याची खात्री यावेळी कामगारांना दिली.

किरीट सोमय्या म्हणाले, मी आलो म्हणजे कारखाना बंद पडणार कामगार बेरोजगार होणार हे कुणी सांगितले. ‘क्रांती हटाव कारखाना बचाव’ असे बोर्ड लागल्याने कारखाना बंद होणार असल्याची अफवा पसरविण्यात आली. परंतु भ्रष्टाचार व लबाडी केल्याबद्दल जाब विचारला गेला असता घोटाळेबाजांनी हा भ्रम कामगारांमध्ये पसरवला आहे. त्यामुळे शाश्वस्ती देण्यासाठी आलो आहे. शेतमजुर व कामगार यांच्या हितासाठी आलो आहे. तुमचे नुकसान होणार नाही याची काळजी घेतली जाईल. पारनेर कारखाना विक्रीत लबाडी केली असली तर चौकशी होणार. त्यामुळे चौकशी सुरू झाली तर कारखाना बंद होणार नाही. तुमचा रोजगार पण सुरक्षित राहणार आहे. त्यामुळे घोटाळाबाज जर तुमची ढाल म्हणून वापर करत असतील तर चुकीचे असल्याचे सोमय्या कामगारांशी संवाद साधताना सांगितले.

राजीव गांधी म्हणायचे एक रुपया निधी पाठविला तर 10 पैसे खात्यावर जायचे; परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या काळात ज्याचे त्याचे पैसे कामगारांच्या खात्यावर जमा होत आहेत. गरीब शेतकरी व कामगारांच्या जीवावर कोणी बंगले बांधणार असेल किंवा न्यायालयाचा आदेश जर धाब्यावर बसवून कारखाना बळकावण्याचा प्रयत्न करत असेल तर हे चुकीचे आहे. कोल्हापूरमध्ये सुद्धा असा घोटाळा झाला आहे. कारखान्यात जर घोटाळा झाला असेल तर त्या पैशांचा हिशोब देऊन ते पैसे शेतकरी व कामगारांच्या खात्यांवर जमा झाले पाहिजेत. न्यायालयाने चौकशी आदेश दिले आहेत. परंतु भिती दाखवून शेतकर्‍यांच्या जमिनी हडप होणार असेल तर सोडणार नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या एका सहाकार्‍याने सांगितले म्हणून याठिकाणी गरीब शेतकरी व कामगारांसाठी आलो असल्याचे सोमय्या म्हणाले. चौकशीतून दूध का दूध आणि पाणी का पाणी होणार असल्याचे सोमय्या म्हणाले.

भाजपाचे माजी खासदार किरीट सोमय्या गुरुवारी पारनेर दौर्‍यावर आले होते. यावेळी भाजपाच्यावतीने त्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले. यावेळी भाजपाचे जिल्हाध्यक्ष अरुण मुंढे, बाळासाहेब भेगडे, विश्वनाथ कोरडे, सुनील थोरात, साहेबराव मोरे यांच्यासह पारनेर कारखाना बचाव कृती समितीचे सदस्य उपस्थित होते. यावेळी कामगार पगारासह इतर समस्यांवर चर्चा करण्यात आली.

- Advertisment -

ताज्या बातम्या