Saturday, May 11, 2024
Homeमहाराष्ट्रसावकारी कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी कायद्यातील त्रुटींचा अभ्यास करण्यासाठी समिती गठीत

सावकारी कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी कायद्यातील त्रुटींचा अभ्यास करण्यासाठी समिती गठीत

नेवासा l तालुका प्रतिनिधी l Newasa

सावकारी कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी कायद्यातील त्रुटींचा अभ्यास करुन अहवाल शासनास सादर करणेसाठी महाराष्ट्र शासनाचे सहकार, पणन व वस्रोद्योग विभागाने माजी विधान परिषद सदस्य श्रीमती विद्या चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत केली आहे.

- Advertisement -

महाराष्ट्र विधानमंडळाचे सन 2019 चे चौथे (हिवाळी) अधिवेशनामध्ये तत्कालीन विधान परिषद सदस्य श्रीमती विद्या चव्हाण यांनी महाराष्ट्र विधानपरिषद नियम 97 अन्वये महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम,2014 ची प्रभावी अंमलबजावणी करणेसाठी सदर कायद्यामध्ये सुधारणा करण्याची आवश्यकता असल्याबाबतची अल्पकालीन चर्चेची सूचना दिली होती. सदर अल्पकालीन सूचनेवरील चर्चेदरम्यान तत्कालीन सहकार मंत्री यांनी सावकारी कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी कायद्यातील त्रुटींचा अभ्यास करुन त्यानुसार शासनास अहवाल सादर करण्यासाठी श्रीमती आ. विद्या चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात येत असल्याचे आश्वासन सभागृहात दिले होते. त्यानुषंगाने सावकारी कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी कायद्यातील त्रुटींचा अभ्यास करुन त्यानुसार शासनास अहवाल सादर करण्यासाठी खालीलप्रमाणे समिती गठीत करण्यात आली आहे.

अध्यक्ष :

श्रीमती विद्या चव्हाण( माजी वि.प.सदस्य)

सदस्य :

श्री.ख्वाजा बेग(माजी वि.प.स. सदस्य), श्री.अंबादास दानवे(वि.प.स. सदस्य), श्री.रामहरी रुपनवार(माजी वि.प.स.सदस्य), श्रीमती डॉ.आशाताई मिरगे, श्री.घनश्याम दादाजी दरणे, अड.श्री.गजानन बोचे, श्री.शंतनू अशोकराव पाटील, श्री.रमेश चव्हाण,(सहसचिव,महसूल विभाग), श्री.किशोर भालेराव (उपसचिव,विधी,गृह विभाग), सावकारांचे महानिबंधक तथा अपर आयुक्त व विशेष निबंधक(सहकार आयुक्त कार्यालय,पुणे)

सदस्य सचिव :

उपनिबंधक (सावकारी,सहकार आयुक्त कार्यालय)

सदर समितीने आपला अहवाल 3 महिन्यामध्ये शासनास सादर करावयाचा आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या