Saturday, April 27, 2024
Homeजळगावदोन महिन्यांसाठी आता पर्यटन स्थळावर जाणे विसरा

दोन महिन्यांसाठी आता पर्यटन स्थळावर जाणे विसरा

जळगाव jalgaon । प्रतिनिधी

जिल्ह्यातील मॉन्सून कालावधी (Monsoon period) लक्षात घेता पर्यटनादरम्यान (During tourism) कुठलाही अनुचित प्रकार (improper type) घडु नये यासाठी गुरूवारपासून पुढील दोन महिन्यांपर्यंत जिल्ह्यातील सहा पर्यटन स्थळांवर (tourist spots) जमावबंदी आदेश (Prohibition order) लागू करण्यात आला आहे. याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी आज जारी केले.

- Advertisement -

जळगाव जिल्ह्यात आत्तापर्यंत 120 टक्के पाऊस झाला आहे. गत 28 दिवसांत मुक्ताईनगर, बोदवड आणि धरणगाव वगळता इतर सर्व तालुक्यामंध्ये पावसाने सरासरी ओलांडली आहे. पुढील महिन्यात देखिल पावसाचा जोर कायम राहणार असल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

गेल्या रविवारी यावल तालुक्यातील निंबादेवी डॅम येथे पर्यटकांची हजारोंच्या संख्येने गर्दी झाली होती. त्याचे फोटो आणि व्हिडीओ देखिल सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. जिल्ह्यातील कोरोनाचे प्रतिबंध लागू असतांना पर्यटकांची ही गर्दी जिल्हा प्रशासनाने गांभीर्याने घेतली आहे.

या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सहा पर्यटन स्थळांवर दोन महिन्यांसाठी कलम 144 जमावबंदी लागू करण्याचे आदेश जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दिले आहे. त्यामुळे आता दोन महिने पर्यटनस्थळावर जाण्यावर निर्बंध लागणार आहे. जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केल्यास आपत्ती व्यवस्थापन कायदा अंतर्गत संबंधितांवर कठोर कारवाई केली जाणार आहे.

या पर्यटनस्थळांवर आहे जमावबंदी

जमावबंदी लागू केलेल्या पर्यटनस्थळांमध्ये यावल तालुक्यातील सावखेडा सिम निंबादेवी धरण परिसर, मनुदेवी येथील धबधब्याजवळी सुरक्षा कठड्याजवळील परिसर, चाळीसगाव तालुक्यातील पाटणादेवी अभयारण्य येथील धवलतिर्थ व केदारकुंड धबधबा परिसर, रावेर तालुक्यातील सुकी धरणाखालील पात्र परिसर आणि जळगाव तालुक्यातील कांताई बंधारा परिसर यांचा समावेश आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या