Friday, April 26, 2024
Homeनाशिकवन अधिकाऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या

वन अधिकाऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या

नाशिक | Nashik

कळवण तालुक्यातील (Kalwan) दह्याने (Dahyane) परिमंडळ अधिकारी कौतिक गंगाधर पाटील (वय ५७ रा. संजय नगर, अभोणा यांनी त्यांच्या राहत्या घराच्या छताचा लोखंडी हुकला सुताच्या दोरीच्या साहाय्याने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना घडली. घटनास्थळी पोलिसांना सुसाइड नोट सापडली आहे…(forest officer suicide in dahyane kalwan)

- Advertisement -

घटनेची माहिती मिळताच तात्काळ सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन शिंदे (API Nitin Shinde) यांनी सहकाऱ्यांसह घटनास्थली रीतसर पंचनामा करून तपासणीसाठी शव अभोणा ग्रामीण रुग्णालयात पाठविले.

रात्री उशिरा पाटील यांच्यावर दह्याने येथे त्यांच्या शेतात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, दोन मुले असा परिवार आहे. दरम्यान, कौटुंबिक घडी सुस्थितीत नोकरीतून सेवानिवृत्तीस अवघे काही महिने शिल्लक असताना पाटील यांनी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलल्याने घटनेचे गूढ वाढले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या