Wednesday, April 24, 2024
Homeनगरभारत जोडो यात्रा फक्त सत्ता, स्वार्थ व खुर्ची मिळवण्याकरिता - वनमंत्री मुनगंटीवार

भारत जोडो यात्रा फक्त सत्ता, स्वार्थ व खुर्ची मिळवण्याकरिता – वनमंत्री मुनगंटीवार

शिर्डी |प्रतिनिधी| Shirdi

भारत जोडो यात्रा ही फक्त स्वार्थ सत्ता व खुर्ची मिळवण्या पुरतीच आहे. काँग्रेसने देशात 52 वर्षे व महाराष्ट्रात 47 वर्षे तसेच शिवसेनेसोबत 2 वर्षे सत्ता भोगली त्यामुळे या यात्रेत ‘हा मैने क्या किया’ हे ते सांगू शकत नाही. अशी प्रतिक्रिया वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केली.

- Advertisement -

वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी बुधवारी सकाळी शिर्डी येथे येऊन साई समाधीचे दर्शन घेतले. संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बानायत यांनी त्यांचा सत्कार केला. त्यांच्या समवेत माजी आ. स्नेहलता कोल्हे, भाजपचे जिल्हा अध्यक्ष राजेंद्र गोंदकर, भायुमोचे प्रदेश उपाध्यक्ष सचिन तांबे, डॉ. राजेंद्र पिपाडा यांच्यासह भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते.

प्रसार माध्यमांशी बोलताना वनमंत्री मुनगंटीवार म्हणाले, इतकी वर्षे काँग्रेस सत्तेत असताना त्यांनी भारत देशाचा गौरव वाढवावा असे कुठलेही काम केले नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागरिकांसाठी 18 कोटी शौचालये, 3 कोटी 22 लाख घरकुले, 550 नवीन युनिव्हर्सिटी असे विविध प्रकल्प राबवले आहेत. राहूल गांधींची भारत जोडो यात्रा सुरू आहे. या यात्रेचा फायदा भाजपालाच झाला असून, जिथे भारत जोडो यात्रा गेली तिथे निवडणुकीत भाजपाला चांगले यश मिळाले. राहूल गांधींनी भारत जोडो यात्रा नव्हे तर काँग्रेस जोडो यात्रा सुरू करणे अपेक्षित आहे.

अफजल खानाच्या कबरीच्या बाजूला केलेलं अतिक्रमण माझ्या लक्षात आल्यानंतर अतिक्रमण काढण्यात आलं. छत्रपती शिवाजी महाराजांच्या गड किल्ल्यावर कोणालाही अतिक्रमण करता येणार नाही. ज्यांनी गडकिल्ल्यावर अतिक्रमण केलं असेल त्यांनी स्वतःहून काढावे अन्यथा कडक कारवाई केली जाईल. महाराष्ट्रातील राजकीय स्तर खालवला असून त्यावर मंथन होणं अपेक्षित आहे. भाजपाच्या प्रदेशाध्यक्षांबरोबर देशाच्या पंतप्रधानांनावरही खालच्या स्तरावर टीका केली जाते. टीका करणारे राजकीय पक्षाचे बडे नेतेच आहेत. सध्या काही पक्ष फक्त प्रतिस्पर्धी पक्षावर टिका करण्यासाठी चांगल्या शिव्या देणारे प्रवक्ते नेमत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या