Friday, April 26, 2024
Homeनाशिकयेवल्यात वनजमीनधारकांचा मोर्चा

येवल्यात वनजमीनधारकांचा मोर्चा

येवला । प्रतिनिधी Yevla

येवला तालुका ( Yevla Taluka ) व नांदगाव तालुका ( Nandgaon Taluka ) किसान सभेच्या( Kisan Sabha ) वतीने वनजमीनधारकांना पेरणी करण्यास अटकाव करू नये, वीज पुरवठा व पाणी पुरवठा करण्यात यावा, अशा विविध मागण्याकरिता वनजमीन धारकांचा भव्य मोर्चा येवला प्रांताधिकारी कार्यालयावर काढण्यात आला.

- Advertisement -

गेल्या दोन वर्षांपासून करोनाच्या नावाखाली सरकारने चालढकल करत वनजमीन धारकांचा प्रश्न मार्गी न लावता प्रलंबित ठेवला आहे. वनजमीनधारकांच्या ताब्यातील क्षेत्रात वनखात्याकडून दडपशाही सुरू आहे.

वनखात्याकडून जबरदस्तीने वनजमिनीत चार्‍या खोदण्याचे काम केले जात आहे. चार्‍या खोदण्याचे काम तत्काळ बंद करण्यात यावे, ज्या वहित वनजमीन क्षेत्रात वनखात्यानेे चारी केली आहे, त्या ठिकाणी वनजमीनधारकांना पेरणी करण्यास अटकाव करू नये. वनजमीन कसणार्‍यांच्या नावे वनजमीन करण्यात यावी. संपूर्ण वनजमिन मोजुन चतु:सीमासह नावे करण्यात यावे.

वनजमिनीचे वर्षानुवर्षे प्रलंबित वन दावे स्थानिक चौकशी करून कलम 13 नुसार एकापेक्षा दोन पुरावे विचारात घेऊन सर्व दावे मंजूर करा. करोनाकाळात भूमीहिन गरजू लोकांना मोफत धान्य पुरवठा करण्यात यावा.

वनजमिनीत राहणार्‍या लोकांना वीजपुरवठा व पाणीपुरवठा करण्यात यावा. यासह इतर मागण्यासाठी येवला प्रांताधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. याप्रसंगी माजी आ. कॉ. जे. पी. गावीत, कॉ. हनुमान गुंजाळ, कॉ. विजय दराडे, उखा माळी, त्र्यंबक ठाकरे आदींसह आदिवासी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या