Saturday, April 27, 2024
Homeधुळे65 लाखांचा विदेशी दारूसाठा जप्त

65 लाखांचा विदेशी दारूसाठा जप्त

धुळे – Dhule – प्रतिनिधी :

राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या नाशिक येथील भरारी पथकाने साक्री तालुक्यातील छडवेल शिवारातील हॉटेल नवरंग नाव असलेल्या शेडमधून 65 लाख 30 हजार रूपयांचा विदेशी दारूचा साठा वाहनासह जप्त केला. तसेच एकाला ताब्यात घेण्यात आले. काल रात्री ही कारवाई करण्यात आली.

- Advertisement -

राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या विभागीय भरारी पथकाने मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे काल दि.6 रोजी छडवेल शिवारात दहिवेल-छडवेल रोडलगत हॉटेल नवरंग नाव असलेल्या सिंमेंट विटाच्या पक्या घर वजा शेडमध्ये छापा टाकला.

यावेळी रॉयल ब्ल्यु मास्टर व्हिस्की गोवा राज्य निर्मित 180 मि.क्षमतेच्या.लि.26400 बाटल्या 550 बॉक्स, किंगफिशर एक्स्टा स्टाँग प्रिमिअम बिअर 500 मि क्षमतेचे. लि.16800 टिन कॅन/700 बॉक्स असे एकुण 1250 बॉक्स व 2 वाहने असा एकुण 65 लाख 30 हजा रूपये किंमतीचा मुद्येमाल जप्त करण्यात आला. तसेच एकाला ताब्यात घेण्यात आले.

ही कारवाई विभागीय भरारी पथकाचे निरीक्षक आर.एम. फुलझळके, विशेष भरारी पथकाचे निरीक्षक एम.बी. चव्हाण व नंदुरबार, धुळे येेथील पथक तसेच विभागीय भरारी पथकाचे दुय्यम निरीक्षक एस. एस. रावते, डी.एन.पोटे, जवान गोकुळ शिंदे, विठ्ठल हाके, भाऊसाहेब घुले, लोकेश गायकवाड यांनी केली. पुढील तपास विभागीय भरारी पथकाचे दुय्यम निरीक्षक एस.एस. रावते हे करीत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या