Saturday, April 27, 2024
Homeदेश विदेशमुकेश अंबानीच सर्वाधिक श्रीमंत भारतीय

मुकेश अंबानीच सर्वाधिक श्रीमंत भारतीय

नवी दिल्ली –

फोर्ब्सने सन 2020ची 100 सर्वाधिक श्रीमंत भारतीयांची यादी जाहीर केली आहे. या यादीनूसार रिलायन्स इंडस्ट्रिज लिमिटेडचे (आरआयएल) अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी सलग

- Advertisement -

13व्या वर्षी आपले अव्वल स्थान कायम राखले आहे. मुकेश अंबानींकडे 88.7 अब्ज डॉलर संपत्ती आहे. नुकतेच लॉकडाऊनच्या काळात सगळीकडे मंदीची स्थिती असताना रिलायन्स समुहाच्या जियो आणि रिलायन्स रिटेलमध्ये जगातील अनेक बड्या कंपन्यांनी गुंतवणूक केली. यामुळे त्यांच्या संपत्तीत वाढ झाली आहे. तर यादीत अनेक नावं पहिल्यांदाच समाविष्ट झाले आहेत. तर केवळ तीन महिलांनी या यादीत स्थान पटकावले आहे.

मुकेश अंबानी यांच्यानंतर दुसर्‍या स्थानी अदाणी समुहाचे अध्यक्ष गौतम अदाणी आहेत. अदाणींची एकूण संपत्ती 25.2 अब्ज डॉलर आहे.

तिसरे स्थान एचसीएल टेक्नॉलॉजिजचे अध्यक्ष शीव नाडर यांनी पटकावले आहे. नाडर यांची संपत्ती 20.4 अब्ज डॉलर आहे.

तर चौथ्या क्रमांकावर डी मार्टचे मालक राधाकिशन दमानी हे आहेत. ते 15.4 अब्ज डॉलर संपत्तीचे मालक आहेत.

पाचव्या क्रमांकावर हिंदुदजा ब्रदर्सच्या नावाचा समावेश आहे. हिंदुजा ब्रदर्सची संपत्ती 12.8 अब्ज डॉलर आहे.

सहाव्या क्रमांकावर सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे मालक सायरस पूनावाला यांचा समावेश आहे. त्यांची संपत्ती 11.5 अब्ज डॉलर इतकी आहे.

सातव्या स्थानी पालोनजी मिस्त्री हे आहेत, त्यांची संपत्ती 11.4 अब्ज डॉलर आहे.

कोटक महिंद्रा बँकेचे अध्यक्ष उदय कोटक हे आठव्या स्थानी आहेत. त्यांची संपत्ती 11.3 अब्ज डॉलर आहे.

तर नववे स्थान गोदरेज कुटुंबाला मिळाले आहे. त्यांची संपत्ती 11 अब्ज डॉलर आहे.

तसेच दहाव्या क्रमांकावर स्टील उत्पादक कंपनी आर्सेलर मित्तलचे अध्यक्ष लक्ष्मी मित्तल यांचा समावेश आहे. त्यांची संपत्ती 10.3 अब्ज डॉलर आहे.

सर्वाधिक 100 श्रीमंत भारतीयांच्या यादीत केवळ तीन महिला

फोर्ब्सने जाहीर केलेल्या भारतातील सर्वाधिक 100 श्रीमंत लोकांच्या यादीत केवळ तीनच महिलांचा समावेश आहे. यामध्ये ओपी जिंदाल समुहाच्या सावित्री जिंदाल या 19व्या स्थानी आहेत. त्यांची संपत्ती 6.6 अब्ज डॉलर इतकी आहे. त्यानंतर बायोकॉनच्या किरण मुजूमदार शॉ या 27व्या स्थानी आहेत. त्यांची संपत्ती 4.6 अब्ज डॉलर आहे. तर युएसव्हीच्या लीना तिवारी या तीन अब्ज डॉलर संपत्तीसह 47व्या स्थानी आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या