Friday, April 26, 2024
HomeUncategorizedForbes च्या Top 20 आशियाई महिला उद्योजकांची यादी जाहीर, भारतातील तिघींचा समावेश

Forbes च्या Top 20 आशियाई महिला उद्योजकांची यादी जाहीर, भारतातील तिघींचा समावेश

फोर्ब्सने (Forbes) नोव्हेंबरमध्ये प्रसिद्ध केलेल्या 20 आशियाई महिला उद्योजकांच्या यादीत तीन भारतीय महिलांचा समावेश करण्यात आला आहे.

या यादीत ज्यांनी कोविड-19 (covid 19) साथीच्या आजारामुळे निर्माण झालेल्या अनिश्चिततेमध्ये आपला व्यवसाय वाढवण्यात उल्लेखनीय यश मिळवले.

- Advertisement -

या यादीत स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड (SAIL) च्या अध्यक्षा सोमा मंडल, एमक्योर फार्माच्या एग्जीक्यूटिव्ह डायरेक्टर नमिता थापर आणि होनासा कंज्यूमरच्या सह-संस्थापक आणि चीफ इनोव्हेशन ऑफिसर गजल अलघ यांचा समावेश आहे.

सोमा मंडल या स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड (SAIL) च्या सध्याच्या अध्यक्षा आहेत. 1 जानेवारी 2021 रोजी त्यांनी पदभार स्वीकारला. सोमा मंडल या सेलच्या पहिल्या महिला कार्यकारी संचालक तसेच पहिल्या महिला अध्यक्षा आहेत. कोविड-19 महामारीमध्ये आर्थिक मंदी असूनही कंपनीमध्ये सातत्य आहे.

नमिता थापर या एक भारतीय उद्योजक आहेत. ज्या भारतातील मल्टीनॅशनल फार्मसी कंपनी एमक्योर फार्मास्युटिकल्सच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. यासोबतच त्या प्रसिद्ध टेलिव्हिजन बिझनेस रिअ‍ॅलिटी शो ‘शार्क टँक इंडिया सीझन 1’ च्या जजही राहिल्या आहेत. नमिता थापर या कॉर्पोरेट जगतातील एक मोठी व्यक्ती आहेत.

गझल अलघ एक भारतीय इंडस्ट्रिलिस्ट, उद्योगपती आणि कॉर्पोरेट आहे. मामा अर्थ या प्रसिद्ध ब्युटी ब्रँडच्या त्या सह-संस्थापक आहे. प्रसिद्ध टेलिव्हिजन बिझनेस रिअ‍ॅलिटी शो ‘शार्क टँक इंडिया सीझन 1’ च्या जज म्हणूनही त्यांनी काम केले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या