Tuesday, April 23, 2024
Homeअहमदनगरअन्नसुरक्षा योजना लाभार्थी निवड मोहीम सुरू

अन्नसुरक्षा योजना लाभार्थी निवड मोहीम सुरू

जामखेड |प्रतिनिधी| Jamkhed

जामखेड तालुक्यात राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेंतर्गत केशरी कार्ड लाभधारक यांना अन्नसुरक्षा योजनेमध्ये सामाविष्ट करून स्वस्त धान्य देण्यासाठी विशेष मोहिमेचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती तहसीलदार योगेश चंद्रे यांनी दिली .

- Advertisement -

ही मोहीम 10 मे ते 6 जून या कालावधीत राबवली जाणार आहे. मोहिमेचे आयोजन आ. रोहित पवार, जिल्हा पुरवठा अधिकारी जयश्री माळी, उपविभागीय अधिकारी अजित थोरबोले यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात येणार आहे. या मोहिमेमध्ये गावातील ज्या लोकांना सध्या धान्य मिळत आहे. परंतु ते मयत आहेत, कायमस्वरूपी स्थलांतरित आहेत. किंवा ज्या लोकांना स्वताहून धान्य लाभ सोडायचा आहे. अशा लोकांचा शोध घेऊन त्याऐवजी गावातील गरीब लोक ज्यांच्याकडे कार्ड आहे.

परंतु त्यांना धान्य मिळत नाही. अशा लोकांना या योजनेमध्ये समाविष्ट करून घेतले जाणार आहे. या अनुषंगाने सर्व तलाठी,कोतवाल ,स्वस्त धान्य दुकानदार, पोलीस पाटील आणि सरपंच यांना बैठक घेऊन सूचना देण्यात आल्या आहेत. या योजनेसाठी उत्पन्नाची मर्यादा हि ग्रामीण भागामध्ये 44 हजार व त्यापेक्षा कमी आणि शहरी भागामध्ये 59 हजार व त्यापेक्षा कमी ठरवून देण्यात आलेली आहे.

असे मोहिमेचे टप्पे

प्रकरणे जमा करणे, छाननी करणे, पात्र लाभार्थी ठरवणे, पात्र लाभार्थी यांची शहानिशा करणे, गावनिहाय याद्या करणे , पात्र लाभार्थी यांचे कार्ड ऑनलाईन करणे, आदेश तयार करणे, असे टप्पे आहेत. नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन तहसीलदारांनी केले.

- Advertisment -

ताज्या बातम्या