Friday, April 26, 2024
HomeनाशिकNashik : मेडिकल कॉलेजमधील विद्यार्थ्यांसह कर्मचाऱ्यांना अन्नातून विषबाधा

Nashik : मेडिकल कॉलेजमधील विद्यार्थ्यांसह कर्मचाऱ्यांना अन्नातून विषबाधा

नाशिक | Nashik

इगतपुरी तालुक्यातील (Igatpuri Taluka) एका नामांकीत मेडिकल कॉलेजमधील सुमारे ८९ विद्यार्थ्यांसह रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना अन्नातून विषबाधा (Food poisoning) झाल्याने खळबळ उडाली आहे…

- Advertisement -

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, येथील धामणगाव (Dhamangaon) जवळ एक नामांकीत मेडिकल कॉलेज असून याठिकाणी एमबीबीएस अभ्यासक्रमाचे विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. यातील ८९ विद्यार्थ्यांसह रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी महाविद्यालयातील कॉलेज कॅम्पसमध्ये असलेल्या कॅन्टीनमध्ये जेवल्यानंतर त्यांना उलट्या आणि पोटदुखीचा त्रास झाला.

त्यानंतर या सर्वांनी रुग्णालयातच उपचार घेतले. यामध्ये सध्या उपचार घेणाऱ्या विद्यार्थ्यांसह काही कर्मचाऱ्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर जवळपास ५० ते ५५ विद्यार्थी अद्यापही डॉक्टरांच्या देखरेखीखाली आहेत.

तसेच हे कॅन्टीन एका खासगी कंपनीद्वारे चालविली जात असल्याचे बोलले जात असून कॅन्टीन चालकाच्या दुर्लक्षामुळे हा प्रकार घडल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे. तसेच या घटनेची वैद्यकीय कायदेशीर केस म्हणून चौकशी (inquiry) केली जात असल्याची माहिती समोर आली आहे.

दरम्यान, याप्रकरणी वाडीवऱ्हे पोलीस ठाण्याचे निरीक्षक अनिल पवार (Anil Pawar) यांनी रुग्णालयास भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. व त्याची नोंद वाडीवऱ्हे पोलीस ठाण्यात (Wadivarhe Police Station) केल्याचे पवार यांनी सांगितले.

- Advertisment -

ताज्या बातम्या