Thursday, April 25, 2024
Homeनाशिकभगूरमध्ये अलुतेदार-बलुतेदार संघटनेतर्फे अन्नदान

भगूरमध्ये अलुतेदार-बलुतेदार संघटनेतर्फे अन्नदान

देवळाली कॅम्प । Deolali Camp

समाजातील अठरापगड जातीच्या युवकांना बरोबर घेऊन स्वराज्यस्थापना करणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी ३५० वर्षांपूर्वी रुजविलेला विचार २१व्या शतकातदेखील अमलात आणण्यासाठी भगूरच्या बारा बलुतेदार आणि अठरापगड जातींच्या कार्यकर्त्यांनी पुन्हा कंबर कसत रयतेला दिलासा देण्यासाठी सुरू केलेला उपक्रम दखलपात्र ठरत आहे.

- Advertisement -

साळी, कोळी, माळी, मराठा, धनगर आदी अठरापगड जातीच्या युवकांना सोबत घेत शिवाजी महाराजांनी स्वराज स्थापनेसाठी पुढाकार घेतला. हे राज्य जनतेचे असावे, यासाठी स्वराज्यातील बारा बलुतेदार व अठरापगड जातीतील युवकाची मोट बांधली. स्वराज्यरक्षण करण्यासाठी या युवकांनी राजांना दिलेली साथ आणि त्यातून निर्माण झालेले हिंदवी स्वराज्य जगभर आपल्या राज्यकारभारासाठी नावाजले गेले.

आजही हीच संकल्पना मांडीत स्वा. सावरकरांच्या पुण्यभूमीतील अठरापगड जातीतील युवक एका ध्येयासाठी एकत्र येऊन छत्रपतींचा विचार पुढे नेण्यासाठी झटत आहेत. शिवाजी महाराजांच्या जयंती उत्सवाचे औचित्य साधून अखिल भारतीय अलुतेदार-बलुतेदार संघटनेचे उपाध्यक्ष कैलास भोर यांनी भगूरमध्ये मध्यवर्ती भागात २५० लिटर क्षमतेचा फ्रीज बसविला आहे.

त्यात सकाळी पुरी-भाजी, दुपारी पोळी-भाजी असे अन्नदान ठेवणे सुरू केले आहे. अनेक गोरगरीब याचा लाभ घेत असून त्याची व्यप्ती वाढविण्यासाठी संघटनेचे भगूर शहराध्यक्ष प्रमोद आंबेकर, ऍड विशाल बलकवडे, बिपीन तडवी, शाम शिंदे, अविनाश दिवटे, रवी काळे, राजू लोहरे, संदीप गोरे, अरुण ओहळ, कैलास करंजकर आदी युवक सरसावले आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या