Friday, April 26, 2024
Homeजळगावनाशिकच्या पथकाचा चाळीसगावात छापा, केली ही कारवाई

नाशिकच्या पथकाचा चाळीसगावात छापा, केली ही कारवाई

चाळीसगाव Chalisgaon प्रतिनिधी

चाळीसगांव शहरात नाशिक विभागाच्या अन्न व औषध प्रशासनाचा छापा, गुटखा आणि पान मसाल्यासारखे अंमली पदार्थ पकडण्यासाठी आज दुपारी छापा टाकला. चाळीसगाव शहरात गुटखा आणि पान मसाल्यांच्या पदार्थावर राज्य शासनाने बंदी घातलेली आहे.

- Advertisement -

मात्र चाळीसगांव तालुक्यासह शहरात खुलेआम विकली जात आहे, याविरोधात कारवाई करण्यासाठी आज अन्न व औषध प्रशासन विभागाने शहरातील अष्टभुजा कॉम्प्लेक्स मधील समर्थ प्रॉव्हिजन, सदाशिव स्वीट्स, सोनल सुपारी इत्यादी ठिकाणी छापा टाकला, यात काही दुकानांवर अंमली पदार्थ जप्त केली असून कारवाई सुरू आहे. ही कारवाई नाशिक विभागाचे सहआयुक्त सी.डी.साळुंके यांच्या समिती अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकारी करीत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या