गणेशोत्सवात फुले महागली

jalgaon-digital
1 Min Read

नाशिक । प्रतिनिधी Nashik

गणेशोत्सवात फुलांना मागणी वाढली असून दर गगनाला भिडले आहेत. मोगरा हजार रुपये तर गुलछडी ४२० रुपये किलोने विक्री होत आहे.

घरोघरी व सार्वजनिक मंडळांचे गणपती, सत्यनारायण पूजन यामुळे फुलांना मागणी वाढत असून दर देखील वाढत आहे. फुलांचे भाव वधारले असल्याने उत्पादक व विक्रेते यांना दिलासा मिळाला आहे. लॉकडाऊनकाळात फुल उत्पादकांना मोठा आर्थिक फटका बसला होता.

गणरायाच्या आगमनामुळे मरगळलेल्या बाजारपेठेत चैतन्य निर्माण झाले आहे. आर्थिक उलाढालीमुळे करोनाचे मळभ दूर सरले आहे.

गणेशोत्सवाने फुल बाजारावरील विघ्न दूर होण्यास मदत झाली आहे. फुलांमध्ये सर्वाधिक भाव मोगर्‍याला असून, एक हजार रुपये प्रती किलो दराने विक्री होत आहे. घरोघरी पुजेसाठी झेंडुच्या फुलांना पसंती दिली जाते. त्यामुळे झेंडूच्या फुलांना अधिक मागणी आहे.

तर विशेष म्हणजे गुलाबापेक्षा झेंडूची फुले जादा भाव घेत आहे. नाशिक शहरात अहमदनगर ,पुणे ,मुंबई या ठिकाणाहून विक्रीसाठी फुले येतात.

लॉकडाऊनमुळे पाच महिने व त्यानंतर मंदिरे बंद असल्यामुळे फुल व्यवसायाला फटका बसला होता. गणेशोत्सवात फुलांना चांगली मागणी असल्याने फुल विक्रेत्यांनी समाधान व्यक्त केले आहे.

फुलांचे दर प्रतिकिलो रुपये

झेंडू ३२०

गुलाब ३००

गुलछडी ४००

मोगरा १०००

शेवंती ३२०

इतर ४००

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *