Friday, April 26, 2024
Homeनाशिकपुराचे पाणी नागरी वस्तीत; गटारी तुंबल्याने रस्ते जलमय

पुराचे पाणी नागरी वस्तीत; गटारी तुंबल्याने रस्ते जलमय

मनमाड । प्रतिनिधी | Manmad

मुसळधार पावसाने (heavy rain) शहर परिसरात अक्षरशः धुमाकूळ घालत जनजीवन विस्कळीत केले.

- Advertisement -

अतिवृष्टीमुळे (heavy rain) शहरातून वाहणारी रामगुळणा आणि पांझन या दोन्ही नद्यांना आलेल्या पुरांनी रौद्ररूप धारण केल्याने पुराचे पाणी नदीकाठच्या अनेक घरासोबत दुकानात आल्याने रहिवाशांसह दुकानदारांची एकच त्रेधातिरपीट उडाली होती. शिवाजी नगर, ईदगाह, कॉलेज रोड, टकार मोहल्ला या भागातील सर्व पूल पाण्याखाली गेल्यामुळे या भागाचा शहराशी असलेला संपर्क तुटला होता. गेल्या 30 वर्षानंतर दोन्ही नद्यांना इतका मोठा पूर (flood) आल्याचे वयोवृद्ध नागरिकांनी सांगितले.

एका आठवड्यात सलग दुसर्‍यांदा नद्याना पूर येऊन त्याचे पाणी घरामध्ये शिरल्यामुळे नागरीक अक्षरश: हताश झाले होते. पालिका प्रशासनातर्फे खबरदरीचा उपाय म्हणून शेकडो लोकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले तर पूरग्रस्तांसाठी गुरुद्वारात राहण्याची आणि भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे. सलग होत असलेला मुसळधार पाऊस आणि नद्याना मोठा पूर आला असला तरी सुदैवाने जीवित हानी झालेली नाही.

गेल्या काही दिवसांपासून शहर परिसरात उघडकीप घेत पाऊस सुरूच होता. रविवारी दुपारनंतर पावसाला सुरुवात होऊन हलक्या सरी बरसल्या मात्र त्यानंतर पावसाचा जोर वाढला आणि मुसळधार पावसाने अक्षरशा झोडपून काढले. पावसाचा जोर इतका होता कि शहरातून वाहणार्‍या रामगुळणा आणि पांझन या दोन्ही नद्या दुथडी भरून वाहू लागल्या.

नेहमी प्रमाणे पुराचे पाणी सर्वात प्रथम गुरुद्वाराच्या मागे असलेल्या नदीकाठच्या घरात पुराचे (flood) पाणी शिरले अचानक आलेल्या पुरामुळे सर्वांचीच तारांबळ उडाली होती. तिकडे या भागातील तीन, आययुडीपी भागातील एक आणि बुरकूलवाडी भागातील एक असे पांच पूल पाण्याखाली गेले होते त्यामुळे एका प्रकारे या भागातील नागरिकांचा संपर्क तुटला होता. पावसाचा सर्वात जास्त फटका विवेकानंद नगर, आययुडीपी, गुरुद्वारा परिसर, गवळीवाडा, ईदगाह आणि टकार मोहल्ला या भागाना बसला.

दोन्ही नद्यांना मोठ्या प्रमाणात पूर आल्याचे पाहून पालिका प्रशासन सतर्क झाले होते. मुख्याधिकारी डॉ. सचिनकुमार पटेल यांच्या मार्गदर्शनाखाली अधिकारी, कर्मचार्‍यानी नदीकाठच्या लोकांना सुरक्षित स्थळी हलविण्यास प्रारंभ केला. ड्रेेनेजची व्यवस्था चांगली नसल्यामुळे सर्वच रस्त्यावर गुडग्या एव्हडे पाणी साचून रस्ते जलमय झाले होते तर सखल भागात देखील पाणी साचले होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या