Friday, April 26, 2024
Homeनाशिकसिन्नर : १४ वर्षांनी जाम नदीला महापुर

सिन्नर : १४ वर्षांनी जाम नदीला महापुर

पांगरी | Pangri

शुक्रवार (दि.११) रोजी सायंकाळी झालेल्या नांदुर् शिंगोटे, मानोरी, कनकोरी, दोड़ी परिसरातील ढगफुटी सदृश्य पावसामुळे जाम नदिला अचानक रात्री १० वाजता महापुर आला आहे.

- Advertisement -

म-हळ – पांगरी रस्त्यावरील पुलावर रात्री अकरा वाजेच्या दरम्यान एक फुट उंचीवरून पाणी वाहु लागल्याने म-हळ पांगरी संपर्क तुटला होता.

एरवी पावसाळ्यात पाण्याचा थेंब ही न वाहणाऱ्या जाम नदिला तब्बल १४ वर्षांनंतर पुर आला. सन २००६ मध्ये याच प्रकारचा महापुर आला होता.

त्यात अनेक शेतकऱ्यांच्या पोल्ट्री फार्म मधील कोम्बड्या वाहून गेल्या होत्या तसेच मृत पावल्या होत्या. परंतु या वर्षी पोल्ट्री धारकांचे नुकसान झाले नसले तरी पुर पाण्यामुळे नदी काठा वरील शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे.

म-हळ बुद्रुक व् म-हळ खुर्द दरम्यान जाम नदिवर फरशी पुलावर पाण्याने पाच फुटाची ऊंची गाठल्याने दोन्ही गावांचा संपर्क तुटला होता. त्यामुळे चांदवड- पुणे या कमी अंतराच्या मधल्या मार्गावरील वाहतूक बंद पडली. परिणामी वाहन धारकांना रात्री सिन्नर मार्गे पुणे असा प्रवास करावा लागला.

तर जाम नदी पुरात कनकोरी येथील पुलावरून रात्री एक इसम वाहून गेल्याची घटना घडली. नि-हाळे येथील अनिल नामदेव भागवत (३२) हा तरुण पुरात वाहून गेला असावा.

- Advertisment -

ताज्या बातम्या