Saturday, April 27, 2024
HomeUncategorizedफ्लिपकार्टची जनरल मर्कंडाइज अँड होम कॅटेगरी लाँच

फ्लिपकार्टची जनरल मर्कंडाइज अँड होम कॅटेगरी लाँच

औरंगाबाद – Aurangabad

फ्लिपकार्ट (Flipkart) होलसेल ही मूळ भारतात जन्माला आलेल्या (Flipkart Group) फ्लिपकार्ट ग्रुपची डिजीटल बी2बी मार्केटप्लेस असून आज त्यांच्या मंचावर जनरल मर्कंडाइज प्रकार लॉन्च करण्यात आला. त्यांच्या ॲपवर जनरल मर्कंडाइज उत्पादने सादर करण्यासोबत फ्लिपकार्ट होलसेलचा प्रयत्न स्थानिक भारतीय निर्मातादार एमएसएमईसह रिटेलरशी तंत्रज्ञानासह संपर्क साधण्याचा राहील. आता अतिरिक्त उत्पादने किराणा आणि छोट्या विक्रेत्यांसाठी होलसेल मार्केटप्लेसवर उपलब्ध असतील.

- Advertisement -

आपला जनरल मर्कंडाइज पोर्टफोलीयो फ्लिपकार्ट होलसेलने लाईव्ह केला असून त्यात घरात वापरता येतील असे चादरी-अभ्रे, भांडी, साठवणुकीशी संबंधित डबे आणि अन्य साधने, घराशी सबंधित साहित्य, खेळणी, लगेज, खेळ आणि तंदुरुस्ती संबंधी 24,000 उत्पादनांचा समावेश असेल. उत्पादनांची ही वर्गवारी आंध्रप्रदेश, आसाम, बिहार, छत्तीसगड, दमण व दीव, गोवा, गुजरात, झारखंड, कर्नाटक, केरळ, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, मणिपूर, मिझोराम, नागालंड, ओडिशा, पॉंडीचेरी, राजस्थान, सिक्कीम, तामिळनाडू, तेलंगण, त्रिपुरा, उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगालमधील किराणा आणि विक्रेत्यांकडे उपलब्ध असेल.

या मंचाद्वारे देशातील राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील 1350+ शहरांमधील 8,000 पिनकोडवर डिलिव्हरी करण्यात येणार आहे. ही उत्पादने अहमदाबाद, दिल्ली, जयपूर, जालंधर, लुधियाना, मीरत, पानिपत, राजकोट, सुरत आणि त्रिपुरा येथील उत्तम निर्मात्यांकडून उपलब्ध होणार आहेत. आगामी 6 महिन्यांत या मंचावर व्यवहार वाढणार असून 55,000 चे लिस्टिंग दाखल होईल. ज्यामुळे पुरवठादार साखळी बळकट होऊन 1,000 विक्रेते मंचावर उपलब्ध होतील.

फ्लिपकार्ट होलसेल’चे वरिष्ठ उपाध्यक्ष आणि प्रमुख आदर्श मेनन म्हणाले की, “आपल्या विस्ताराची घोषणा ही विक्रेते, लहान व्यवसाय आणि किराणा क्षेत्रात समृद्धी आणण्याची वचनबद्धता सतत जपल्याची पोचपावती आहे. तंत्रज्ञानात बळकट क्षमतेला चालना देत आम्ही छोट्या व्यवसायांना प्रगत करण्याच्या दृष्टीने यशस्वी ठरलो आहोत. महत्त्वपूर्ण किंमतीत विस्तारीत उत्पादनांची निवड आता करता येईल. त्याचप्रमाणे अधिक प्रकारांची भर घालून आमच्या मूल्य प्रस्तावांना बळकट करण्यात गुंतवणूक करत आहोत. त्यासाठी महत्त्वपूर्ण पायाभूत सुविधा आणि कामकाज मजबुतीकरणावर भर देण्यात आला. तंत्रज्ञान आणि योग्य गुंतवणुकीच्या साह्याने आम्ही आयुष्यं सोपी करण्यासोबत छोटे व्यवसाय मालक आणि किराणा व्यापार अधिक नफा कसा कमावेल यादृष्टीने प्रयत्नशील आहोत.”

जनरल मर्कंडाइज बाजारपेठ असमान असून विक्रेत्यांना उच्च-गुणवत्ता ब्रँड आणि उत्पादनांना मर्यादीत एक्सेस मिळतो. ज्यामुळे त्यांना निवडीचे पर्यायही मर्यादीत राहतात. पुरवठादार साखळीचा कल ठरावीक असल्याने निर्मात्याला भारतभरातील खरेदीदारापर्यंत पोहोचणे मुश्कील होते. फ्लिपकार्ट होलसेलच्या प्रवेशामुळे व्यवसाय सुलभता गाठून या प्रकारात येणाऱ्या समस्या सोडविण्यावर त्यांचा भर असेल. तसेच निर्मात्यांची पोहोच वृद्धिंगत करण्यासोबत, उच्चतम निवड आणि ग्राहक सुलभता वाढविण्यावर लक्ष राहील.

फ्लिपकार्ट होलसेलने त्यांचा फॅशन पर्याय भारतभरातील ग्राहक वर्गापर्यंत विस्तारित केला आहे. सणासुदीच्या काळात 1100+ नवीन शहरे आणि 7,000 पेक्षा अधिक पिनकोडवर पोहोचण्याचा त्यांचा प्रयत्न राहील. या शहरांमधील फॅशन विक्रेत्यांना आता फ्लिपकार्टचा लाभ होईल. या मंचावर कपडे आणि पादत्राणांकरिता येणाऱ्या ऑर्डरवर त्यांना चांगले मार्जिन कमाविण्याची संधी असेल. फ्लिपकार्ट होलसेलच्या फॅशन पर्यायावर ई-कॉमर्समुळे भरमसाठ वृद्धीची नोंद झाली. ऑनबोर्ड 29,000 फॅशन विक्रेत्यांना 950 विक्रेत्यांची सेवा मिळणार आहे. त्यापैकी बरेच जण हे देशातील मोठ्या फॅशन हबमधील थेट निर्माते आहेत. आगामी महिन्यांत कपडे आणि पादत्राणासंबंधी मुख्य बाजार जसे की. आग्रा, अहमदाबाद, बेंगळूरू, दिल्ली, हैदराबाद, इंदूर, जयपूर, जालंधर, कांचीपुरम, कानपूर, कोलकाता, लुधियाना, लखनऊ, सुरत, त्रिपुरा आणि वाराणसी येथील 2000+ विक्रेते आणि निर्माते वाढविण्याचे फ्लिपकार्ट होलसेलचे ध्येय आहे.

फ्लिपकार्ट होलसेलचे लॉन्च 2020 मध्ये करण्यात आले, आणि ते बेंगळूरू, बिहार, दिल्ली, गुरगाव आणि मुंबईतील फॅशन वर्गवारीद्वारे विक्रेते व छोट्या व्यवसायांकरिता उपलब्ध झाले आणि नवीन ग्राहक वर्गाकडे पोहोचण्यासाठी दृष्टीने विस्तार सुरू आहे.

रिटेल परिघात फ्लिपकार्ट होलसेल एकाच छताखाली पर्याय देऊ करणारे माध्यम आहे. ज्याद्वारे महत्त्वपूर्ण किंमतीत उत्पादनांची मोठी श्रेणी उपलब्ध करून देण्यात येते. तंत्रज्ञान स्वीकारामुळे व्यवसायाला मोठा फायदा झाला आणि त्यांना प्रगतीपथावर राहण्यास मदत झाली. लॉन्चपासून अगदी अल्पावधीत फ्लिपकार्ट होलसेलने देशातील लहान शहरांसह किराणा आणि एमएसएमईना झपाट्याने सेवा पुरवण्याच्या दृष्टीने विस्तार केला. फॅशन, किराणा आणि आता जनरल मर्कंडाइज या मंचावर उपलब्ध आहे.

फ्लिपकार्ट होलसेलने फ्लिपकार्ट ग्रुपच्या अनुभवाला चालना देत, उद्योग क्षेत्राला समजून घेत, डिजीटल क्षमतेने किराणा आणि विक्रेत्यांना चांगल्याप्रकारे सेवा देण्याचा प्रयत्न केला आहे. ते मोठ्या प्रमाणावर खरेदीचा पसंतीचा पर्याय म्हणून ई-कॉमर्सचा अंगीकार करत आहेत. फ्लिपकार्ट होलसेल देशातील 1.5 दशलक्षहून अधिक सदस्यांना सेवा देतो आहे, ज्यामध्ये किराणा, हॉटेल, रेस्टॉरंट आणि कॅफेटेरीया तसेच ओअँडआय (कार्यालये आणि संस्था) यांचा समावेश आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या