Wednesday, April 24, 2024
Homeनगर‘साहेब गद्दारांना क्षमा नाही’

‘साहेब गद्दारांना क्षमा नाही’

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

श्रीरामपूर शहरात काल पालिकेजवळच लावलेल्या ‘साहेब गद्दारांना क्षमा नाही‘ असा फ्लेक्स लावल्याने शहरात एकच चर्चेचा विषय ठरला आहे.

- Advertisement -

सध्या शिवसेनेत चालू असलेल्या बंड प्रकरणावरुन काल श्रीरामपूर शहरात महाविकास आघाडीचा घटक म्हणून शहर काँग्रेसच्यावतीने पालिकेच्या गेटवरच साहेब गद्दारांना क्षमा नाही असा मोठा फ्लेक्स लावण्यात आला आहे. या फ्लेक्सवर स्व. जयंतराव ससाणे, बाळासाहेब ठाकरे दोन साईडला दोघांचे फोटो, मध्यभागी उध्दव ठाकरे यांचा फोटो खाली शहर काँग्रेसचे शहराध्यक्ष संजय छल्लारे यांचा फोटो व दुसर्‍या बाजुला पंजा चिन्ह असा फ्लेक्स चमकत आहे.

मात्र या फ्लेक्स लावण्यामागे मागील पंचवार्षिक पालिका निवडणुकीदरम्यान स्व. जयंतराव ससाणे यांच्याकडून असेच काही लोक निघुन गेले होते. त्यांनी अशाच पध्दतीने स्व. ससाणे यांना धोका देवून स्वतंत्र गट स्थापन केला होता. त्याची सल या स्व. ससाणे यांच्या समर्थकांच्या मनात अजूनही सलत असल्यामुळे या शिवसेनेच्या बंडचा फायदा घेत हा बोर्ड लावण्यात आला आहे. कारण जिल्ह्यात शिवसेनेच्या कोणत्याही शहरात अशा पध्दतीने बोर्ड लावून असा निषेध करण्यात आलेला नव्हता. मात्र श्रीरामपूर शहरात काँग्रेसच्यावतीने अशा प्रकारचा फ्लेक्स लावण्यात आल्याने नवीन चर्चेला उधाण आले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या