Wednesday, April 24, 2024
Homeमुख्य बातम्यापाच राज्यांतील निवडणुकींचा निकाल स्थिती; ग्राफिक्सच्या माध्यमातून

पाच राज्यांतील निवडणुकींचा निकाल स्थिती; ग्राफिक्सच्या माध्यमातून

देशातील पाच राज्यांच्या बहुचर्चित निवडणुकीचा निकाल आज लागला. या निवडणुकीत भाजपनेसर्वच विरोधी पक्षांना भुईसपाट केलेले दिसून येत आहे. एकट्या पंजाबमध्ये आदमी पार्टीला एकहाती सत्ता आलेली आहे. इतर चार राज्यांत मात्र भाजपने कडवी झुंज देत विरोधकांना धडा शिकवला आहे. सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत काय आहे निकालांची स्थिती ग्राफिक्सच्या माध्यमातून बघुयात….

मणिपूरमध्ये भाजप ३२ जागांवर आघाडीवर दिसत आहे. ६० जागांमधील ३१ उमेदवार निवडून येणाऱ्या पक्षाला बहुमत मिळेल. त्यामुळे भाजप सध्यातरी याठिकाणी आघाडीवर दिसत आहे.

- Advertisement -

पंजाबमध्ये आम आदमी पार्टीने जोरदार मुसंडी मारलेली दिसते आहे. तब्बल ९२ जागांवर आघाडी घेत एकहाती विजयाकडे आपने वाटचाल सुरु केलेली आहे.

गोव्यामध्ये ४० पैकी २० जागांवर भाजपने आघाडी घेतली असून कॉंग्रेसला ११ जागांवर आघाडी घेता आली आहे. बहुमताचा एकदा पार करण्यासाठी केवळ एका जागेची आवश्यकता भाजपला दिसते आहे.

उत्तर प्रदेशात सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत २५० जागांवर भाजपला आघाडी मिळाली आहे. त्यामुळे भाजपने पुन्हा आकडा उत्तर प्रदेशात सत्ता मिळवल्याचे दिसते आहे.

उत्तराखंडमध्येही भाजपचाच झेंडा डौलाने फडकताना दिसत आहे. याठिकाणी ७० मधील तब्बल ४७ जागांवर आघाडी भाजपने घेतली आहे. तर कॉंग्रेस दुसऱ्या स्थानी आघाडीवर दिसते आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या