Thursday, April 25, 2024
Homeदेश विदेशदिल्लीत पोलीस आणि दहशतवाद्यांमध्ये गोळीबार

दिल्लीत पोलीस आणि दहशतवाद्यांमध्ये गोळीबार

दिल्ली | Delhi

दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने शकरपूर परिसरात चकमकीदरम्यान ५ दहशतवाद्यांना पकडले आहे. हे सर्व दहशवादी इस्लामिक आणि खलिस्तानी

- Advertisement -

संघटनांशी संबंधित असल्याचे सांगितले जात आहे. या दहशतवाद्यांना पकडण्यासाठी पोलिसांनी दीर्घकालीन मोहीम राबवली होती. पोलिसांनी यावेळी मोठ्या प्रमाणात शस्त्र आणि इतर सामग्री जप्त केली आहे.

स्पेशल सेलचे डीसीपी प्रमोद कुशवाहा यांनी दिलेल्या माहितीनुसार, “दिल्लीमधील शकरपूर परिसरात झालेल्या गोळीबारानंतर पाच जणांना अटक करण्यात आली आहे. यामधील दोघेजण पंजाब तर तिघे जण काश्मीरचे आहेत. शस्त्र तसंच इतर साहित्य जप्त करण्यात आलं आहे”.

दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नार्को दहशतवादाशी संबंधित या ५ दहशतवाद्यांचा पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआय वापर करत होती. या पाचजणांचे कोणत्या दहशतवादी संघटनांशी संबंध आहे, याबाबत माहिती मिळू शकलेली नाही. पकडण्यात आलेले हे पाचजण दिल्लीत मोठा दहशतवादी हल्ला करण्याच्या तयारीत असल्याचीही माहिती मिळत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या